आधी रेप करायचा..नंतर अल्पवयीन मुलींचे Video काढून पॉर्न वेबसाईटवर अपलोड करायचा, पण एक दिवस..

मुंबई तक

Rape Case Viral News :  हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील नारनौंद जिल्ह्यातील एका गावात हादरंवून टाकणारी घटना घडली. गावकऱ्यांना सभ्य वाटणाऱ्या एका व्यक्तीने निरापराध मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त केलं

ADVERTISEMENT

Haryana Rape Case Update
Haryana Rape Case Update
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सोमनाथ लहान मुलींना चॉकलेटचं आमिष दाखवून बोलवायचा आणि...

point

सीबीआयने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली अन्..

point

आरोपीने अल्ववयीन मुलींचे व्हिडीओ काढून इंटरनेटवर अपलोड केले, पण..

Rape Case Viral News :  हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील नारनौंद जिल्ह्यातील एका गावात हादरंवून टाकणारी घटना घडली. गावकऱ्यांना सभ्य वाटणाऱ्या एका व्यक्तीने निरापराध मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. या गंभीर घटनेची सीबीआयने दखल घेत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. हा आरोपी अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण करायचा आणि त्यांचे व्हिडीओ बनवून पॉर्न साईट्सवर अपलोड करायचा. सोमनाथ (40) असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. आरोपी नारनौंदच्या अजीमा गावातील रहिवासी आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सोमनाथ लहान मुलींना चॉकलेटचं आमिष दाखवून त्याच्या दुकानावर बोलवायचा. तो त्या मुलींसोबत अश्लील चाळे करायचा. त्यानंतर त्यांच्यावर अत्याचार करायचा. नराधम आरोपी मुलींवर बलात्कार केल्यानंतर त्यांचे व्हिडीओ  बनवून पॉर्न वेबसाईट्सवर अपलोड करायचा.

हे ही वाचा >> Viral Video: नवरा प्रेयसीसोबत अन् पत्नी थेट पोहचली खोलीत, पुढे जे घडलं...

तसच त्यांना धमकी देऊन पुन्हा पुन्हा त्यांचं लैंगिक शोषण करायचा. आरोपी सोमनाथ दिव्यांग असून तो गावात कॉमन सर्व्हिस सेंटर चालवायचा. गावकऱ्यांसोबत तो प्रेमाने वागायचा, त्यामुळे गावातील लोकांना तो सभ्य वाटायचा. पण त्याच्या या ढोंगी स्वभावामागे मोठा गुन्हेगार लपला होता. जो अल्पवयीन मुलींना त्याच्या वासनेची शिकार बनवायचा.

सीबीआयने केली मोठी कारवाई

सीबीआयने या गंभीर प्रकरणाची दखल घेत मोठी कारवाई केली. इंटरपोलच्या आंतरराष्ट्रीय बाल लैंगिक शोषण (ICSE) डेटाबेस आणि गूगलच्या सायबर टीपलाईन रिपोर्ट्सच्या माध्यमातून या प्रकरणाचा पर्दाफाश झाला. सायबर फॉरेन्सिक टूलच्या मदतीने खुलासा करण्यात आला की, हे अश्लील व्हिडीओ नारनौंदच्या एका गावात बनवण्यात आले होते. 

हे ही वाचा >> 'पती अनैसर्गिक S*% करतो...' सुनेने सासूकडे केली तक्रार, पण सासूनेच...

सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथला बाल लैंगिक शोषण संबंधीत माहिती गोळा करण्याचं वेड होतं. तो स्वत: बनवलेले व्हिडीओ आणि फोटो पॉर्न साईट्सवर अपलोड करायचा आणि त्याच्या मित्रांनाही पाठवायचा. त्याच्या अनेक इमेल आयडीच्या माध्यमातून अशाप्रकारचा डेटा गोळा केल्याचा पुरावा मिळाला आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp