वैष्णवीनंतर आशाराणीनेही स्वत:ला संपवलं! सोलापुरातील संतापजनक घटना, मुलीचे वडील म्हणाले...

मुंबई तक

आशाराणी भोसले हिचे 2019 मध्ये मोहोळ तालुक्यातील पवन भोसले याच्याशी लग्न झाले होते. आशाराणीला तीन वर्षांची एक मुलगी असून, ती दुसऱ्यांदा गर्भवती होती.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

वैष्णवी सारखाच आशाराणीचाही छळ

point

पोटात बाळ असताना घेतला टोकाचा निर्णय

point

आशाराणीच्या वडिलांनी काय काय आरोप?

Solapur Dowry Case : पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण ताजंच असताना राज्यात अजुनही इतर हुंड्याची प्रकरणं समोर येत आहेत. अशातच सोलापूरमध्येही एक संतापजनक घटना घडली आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील चिंचोलीकाटी गावात आणखी एका धक्कादायक घटनेने संपूर्ण राज्य हादरलं आहे. येथील 22 वर्षीय विवाहित गर्भवती महिला आशाराणी पवन भोसले हिने हुंड्याच्या छळाला कंटाळून गळफास घेऊन आपले आयुष्य संपवलं आहे. या प्रकरणात तिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीच्या आधारे पोलिसांनी आशाराणीचा नवरा पवन भोसले, सासू अलका भोसले आणि सासरा बलभीम भोसले यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

हे ही वाचा >> 15 तोळे सोनं, स्कोडा आणि चांदीची भांडी आणि वैष्णवीसारखाच छळ... पुण्यात पुन्हा तोच प्रकार

कार आणि पैशासाठी छळ....

आशाराणी भोसले हिचे 2019 मध्ये मोहोळ तालुक्यातील पवन भोसले याच्याशी लग्न झाले होते. तिच्या माहेरील उषाराणी या बहिणीचे लग्न देखील पवनचा भाऊ ज्ञानेश्वर भोसले याच्याशी झाले होते. आशाराणीला तीन वर्षांची एक मुलगी असून, ती दुसऱ्यांदा गर्भवती होती. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून तिचा नवरा पवन तिला चारचाकी वाहन खरेदी करण्यासाठी आणि खर्चासाठी माहेरील मंडळींकडून पैसे आणण्याची मागणी करत होता. यासाठी तिला सातत्याने मारहाण आणि मानसिक छळ सहन करावा लागत होता.

मुलाला इज्जत का देत नाही म्हणत त्रास...

आशाराणीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की, सासू अलका भोसले आणि सासरा बलभीम भोसले यांनी देखील तिला स्वयंपाक नीट करता येत नाही आणि मुलाला (पवनला) इज्जत देत नाही, अशा टोमण्यांनी मानसिक त्रास दिला. या सततच्या छळाला कंटाळून आशाराणीने 3 जून 2025 रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने चिंचोलीकाटी गावात आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हे ही वाचा >> एकमेकांचे कपडे फाडून लाथा, बुक्क्यांनी मारहाण...; मुंबई एअरपोर्टवर घडला भयानक प्रकार

आशाराणीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीच्या आधारे मोहोळ पोलिसांनी पवन भोसले, अलका भोसले आणि बलभीम भोसले यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 304(ब) (हुंड्यासाठी छळ), 306 (आत्महत्येस प्रवृत्त करणे) आणि 34 (समान हेतू) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, आरोपींची चौकशी सुरू आहे. 

पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणातही तिच्या सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी तिला छळल्याचा आणि तिची हत्या झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. सोलापूरातील ही घटना ताजी असताना, समाजात हुंडा प्रथेविरुद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे. स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, कडक कायदेशीर कारवाई आणि जागरूकता मोहिमांची मागणी केली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp