Viral Video: नवरा प्रेयसीसोबत अन् पत्नी थेट पोहचली खोलीत, पुढे जे घडलं...
पत्नीने नवऱ्याला प्रेयसीसोबत रंगेहाथ पकडले, त्यानंतर बरंच मोठं भांडण झालं. ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
ADVERTISEMENT

मेरठ: उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील एका हायव्होल्टेज फॅमेली ड्रामा पाहायाला मिळाला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही घटना नौचंडी कॉलनीची आहे. जिथे एका पत्नीने तिच्या नवऱ्याला त्याच्या प्रेयसीसोबत रंगेहाथ पकडले. त्यानंतर झालेला गदारोळ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला.
पत्नीने नवऱ्याच्या प्रेयसीशी केले भांडण
पती गेल्या तीन महिन्यांपासून वेगळ्या समुदायाच्या तरुणीसोबत भाड्याच्या घरात राहत होता. पत्नीला याची माहिती मिळाल्यावर तिने पतीचा माग काढला आणि थेट जिथे पती प्रेयसीसोबत राहत होता त्या ठिकाणी ती पोहोचली. तिथे प्रेयसीला पाहून पत्नीला प्रचंड राग आला आणि दोघींमध्ये भांडण सुरू झालं. पती मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत होता. पण सगळं प्रकरण तोवर हाताबाहेर गेलं होतं.
हे ही वाचा>> महिला शिक्षिकेला लागलेलं सेक्सचं व्यसन! विद्यार्थ्यांना घेऊन जायची हॉटेलवर अन्...
स्थानिकांनी केली मध्यस्थी
कॉलनीमध्ये गोंधळ आणि भांडण पाहून स्थानिक लोक जमले. त्यांनी कसे तरी दोन्ही महिलांना वेगळे केले आणि प्रकरण शांत केले. दरम्यान, कोणीतरी या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवला जो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली.
पत्नीने केले गंभीर आरोप
पत्नी सायमाने सांगितले की तिचे आणि तिच्या पतीचा 2016 मध्ये प्रेमविवाह झाला होता. त्यांना दोन मुली आहेत, एक 8 वर्षांची आणि दुसरी 4 वर्षांची. सायमाचा आरोप आहे की, तिचा पती गेल्या तीन वर्षांपासून एका तरुणीशी संबंधात आहे आणि आता तो तिच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. पत्नीचे म्हणणे आहे की, तिचा पती अनेकदा प्रेयसीला सोडून देण्याबद्दल बोलत असे, परंतु आता तो तिच्यासोबत राहत आहे.
हे ही वाचा>> 'पती अनैसर्गिक S*% करतो...' सुनेने सासूकडे केली तक्रार, पण सासूनेच...
पतीने दोन्ही महिलांसोबत राहण्यास नकार दिला
सायमाने या प्रकरणी नौचंडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तिच्या प्रेयसीनेही त्याला मारहाण केल्याचा आरोप आहे. पोलीस ठाण्यात पतीची चौकशी केली असता, त्याने सांगितले की तो आता दोघांपैकी कोणालाही ठेवू इच्छित नाही.
पोलिसांनी सांगितले की तपास सुरू आहे
या प्रकरणावर, सीओ सिव्हिल लाईन अभिषेक तिवारी म्हणाले की, हे प्रकरण नौचंडी पोलीस ठाण्याच्या परिसरातील आहे. एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये एकाच कुटुंबातील लोक भांडताना दिसत आहेत. पोलिसांनी व्हिडिओची दखल घेतली आहे आणि प्रकरणाची चौकशी केली जात आहे. आवश्यक कायदेशीर कारवाई केली जाईल.