सिंधुताई सपकाळांचं नाव, लग्नासाठी रजिस्ट्रेशनच्या नावाने पैसे उकळले, फसवणुकीचं प्रकरण काय?

ओमकार वाबळे

ममता सपकाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा त्यांनी त्या क्रमांकावर संपर्क साधला तेव्हा त्यांच्याकडे गेट पासच्या नावाखाली पैसे मागण्यात आले. तेव्हा नेमकं काय घडलं वाचा...

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सिंधुताई सपकाळ यांच्या नावाचा वापर करुन फसवणूक

point

ममता सपकाळ यांनी फोन केल्यावर नेमकं काय घडलं?

पुणे: दिवंगत समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या नावाचा गैरवापर करून फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. काही लोकांनी लग्नाच्या नावाखाली लोकांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या फसवणुकीत काहीजण स्वतःला सिंधुताई सपकाळ यांच्या आश्रमाशी संबंधित आहोत असं सांगून लोकांकडून पैसे उकळत होते.

हे ही वाचा >> गुरु-शिष्याच्या नात्याला काळीमा! आधी हॉटेलमध्ये नंतर स्वत:च्याच घरात, शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत...

या प्रकरणातील आरोपींनी अनेक कुटुंबांना फोन करून पुण्यातील सिंधुताई सपकाळ आश्रमात लग्नासाठी मुली उपलब्ध असल्याचं सांगितलं. यासाठी त्यांनी 15 हजार रुपये नोंदणी शुल्काच्या नावाखाली ऑनलाइन पेमेंट करण्यास सांगितलं. हे पेमेंट फोनपे आणि गूगल पे यांसारख्या माध्यमांद्वारे करवून घेतलं गेलं.

फसवणुकीचा उलगडा कसा झाला?

ममता सिंधुताई सपकाळ यांना एका व्यक्तीनं या बनावट मॅट्रिमोनियल जाहिरातीची माहिती दिली, त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. ममता सपकाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा त्यांनी त्या क्रमांकावर संपर्क साधला तेव्हा त्यांच्याकडे गेट पासच्या नावाखाली पैसे मागण्यात आले. काही मुलींचे फोटोही पाठवण्यात आले. मात्र, या मुलींचा आश्रमाशी काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट झालं. त्यावेळी हा संपूर्ण प्रकार फसवणुकीचा असल्याचं उघड झाले.

हे ही वाचा >> RCB च्या विजयावर विरजण, विजयी मिरवणुकीत भयंकर चेंगराचेंगरीत 11 चाहत्यांचा मृत्यू... नेमकं काय घडलं?

ममता सपकाळ यांनी याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 319(4), 318(4), आणि 356(2) तसंच आयटी कायद्याच्या कलम 66 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुणे एसपी संदीप गिल यांनी सांगितलं की, हा प्रकार एका मोठ्या रॅकेटशी जोडलेला असण्याची शक्यता आहे. राज्यभरात अशा प्रकारे अनेक लोकांची फसवणूक झाली असण्याची भीती आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp