भाजप महिला नेत्याने बॉयफ्रेंडकडून करवला स्वत:च्या मुलीवर बलात्कार? BJP ची मोठी कारवाई
BJP Former leader Viral News : हरिद्वारमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील एका महिलेवर तिच्या 13 वर्षीय मुलीवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

भाजपने पक्षातून महिला नेत्याची केली हकालपट्टी

बलात्काराच्या केसमध्ये महिलेचा प्रियकर अन् मित्रांना ठोकल्या बेड्या

पीडित मुलींन घडलेला धक्कादायक प्रकार वडिलांना सांगितला अन्..
BJP Former leader Viral News : हरिद्वारमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील एका महिलेच्या13 वर्षीय मुलीवर लैंगिक शोषण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या महिलेनं तिचा प्रियकर आणि मित्रांकडून तिच्या मुलीचं लैंगिक शोषण केल्याचं उघडकीस आलंय. आरोपी महिला भाजपची महिला मोर्चाची माजी जिल्हाध्यक्ष आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी तातडीनं कारवाई करत या महिलेसह तिचा मित्र सुमित पटवालला अटक केली आहे. पोलिसांकडून आणखी एका फरार आरोपीचा शोध सुरु आहे.
पक्षातून महिला नेत्याची केली हकालपट्टी
हे धक्कादायक प्रकरण समोर आल्यानंतर भाजपने कडक कारवाई केली आहे. हरिद्वार भाजपचे जिल्हाध्यक्ष आशुतोष शर्माने आरोपी महिलेला पक्षातून बाहेर काढलं आहे.रिपोर्टनुसार, अटक केलेल्या महिलेचा काही दिवसांपासून तिच्या पतीसोबत वादविवाद सुरु होता. त्यांची 13 वर्षांची मुलगी एक महिन्यापासून वडिलांसोबत राहत होती. मुलगी काही दिवसांपासून शांत होती.
हे ही वाचा >> 'पती अनैसर्गिक S*% करतो...' सुनेने सासूकडे केली तक्रार, पण सासूनेच...
जेव्हा वडिलांनी तिच्याशी बोलणं केलं, तेव्हा मुलीनं आईच्या संतापजनक कृत्याबाबत वडिलांना सांगितलं. तिने सांगितलं की, तिच्या आईने तिचा प्रियकर सुमित पटवाल आणि काही अन्य लोकांनी लैंगिक शोषण केलं. मुलीची व्यथा ऐकूण वडिलांच्या पायाखालची वाळूच सरकली. त्यांनी तातडीनं पोलिसांना याप्रकरणाची माहिती दिली.
पोलिसांनी केली कारवाई
या प्रकरणी तक्रार दाखल होताच पोलिसांनी वेगानं सूत्र हलवली. कसून तपास केल्यानंतर आरोपी महिला आणि तिचा प्रियकर सुमित पटवालला अटक करण्यात आली. मुलीवर अत्याचार झाल्याचं मेडिकल टेस्टमधूनही समोर आलं आहे. या गंभीर प्रकरणावर एसएसपी प्रमेन्द्र सिंह डोबाल यांनी म्हटलं की, रानीपूर हद्दीत हे प्रकरण समोर आलं आहे.
हे ही वाचा >> पतीचं विधवा महिलेसोबत अफेअर, पत्नीने थेट भाच्यासोबत नको ते केलं अन्...
पोलिसांनी त्वरित गुन्हा दाखल केला. पीडितेचा जबाब आणि मेडिकल टेस्ट करण्यात आली आहे. यामाध्यमातून आरोप सिद्ध झाले आहेत. पोलिसांनी आरोपींना अटक करून जेलमध्ये पाठवलं आहे. तसच पोलिसांनी फरार आरोपी शुभमलाही अटक केली आहे. पोलिसांनी या आरोपीला मेरठ उप्र येथून बेड्या ठोकल्या. तसच पोक्सो कायद्यांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.