पुण्यातील शिक्षकाने पेपर सोडवायला रात्री बोलावलं, काही तरी भलतंच...
Pune News : शिक्षणाचं माहेरघर असणाऱ्या पुणे शहरातील काही शिक्षिकांचा प्रताप समोर आला आहे. विद्यार्थ्यांना परिक्षेत पास करतो असे आमिष दाखवून लाखो रुपये उकळले आहे. या घटनेनं संतापाची लाट पसरली असून शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
शिक्षणाचं माहेरघर असणाऱ्या पुणे शहरातील काही शिक्षिकांचा प्रताप समोर
पैसे घेऊन विद्यार्थ्यांना पेपर सोडवण्यास दिले
Pune News : शिक्षणाचं माहेरघर असणाऱ्या पुणे शहरातील काही शिक्षिकांचा प्रताप समोर आला आहे. विद्यार्थ्यांना परिक्षेत पास करतो असे आमिष दाखवून लाखो रुपये उकळले आहे. या घटनेनं संतापाची लाट पसरली असून शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दरम्यान, ही घटना पार्वतीबाई गेनबा मोझे विद्यालयातील आहे. या महाविद्यालयात गणिताच्या पेपरमध्ये पास करण्याचे आमिष दाखवत लाखो रुपये उकळ्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
हेही वाचा : गुरु-शिष्याच्या नात्याला काळीमा! आधी हॉटेलमध्ये नंतर स्वत:च्याच घरात, शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत...
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने कारवाई करत प्रोफेसरसह चौघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. परिक्षेत पास करण्यासाठी शिक्षिकांनी विद्यार्थ्यांकडून 10 ते 15 हजार रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला. प्रतिक किसन सातव यासह आदित्य खिलारे, अमोल नागरगोजे, अनिकेत रोडे यांचा समावेश होता. या प्रकरणात पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षातील विद्यार्थ्यांचा गणिताचा पेपर होता. पेपर झाल्यानंतर पेपर जमा करण्यात आले आणि तेच पेपर लिहिण्यासाठी रात्रीच्या सुमारास देण्यात आले. याचपार्श्वभूमीवर आता पुणे पोलिसांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे गणित 2 या विषयाच्या लिहिण्यात आलेल्या एकूण उत्तरपत्रिकेचे 6 बंडल, 2 लाख 6 हजार रुपये आणि उत्तरपत्रिका ठेवण्यात आलेल्या कंट्रोल रुमची चावी असा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना गणितात पास होण्यास भिती वाटते अशांकडून पैसे घ्यायचे आणि त्यांना परीक्षेत पास करायचे. प्रोफेसरला आर्थिक फायदा मिळवण्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांकडून 10 - 50 हजार रुपयांची मागणी केली आणि त्याबदल्यात विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षा सोडवायला दिली. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी आरोपींना घेरलं आहे.










