पतीचं विधवा महिलेसोबत अफेअर, पत्नीने थेट भाच्यासोबत नको ते केलं अन्...

मुंबई तक

Extra Marital Affaire Viral News : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊच्या बंथरा पोलीस स्टेशन हद्दीतील दरियापूर परिसरात धक्कादायक घटना घडली. एका रेल्वे कर्मचाऱ्याच्या हत्येमुळं खळबळ माजलीय.

ADVERTISEMENT

Extra Marital Affaire Shocking News
Extra Marital Affaire Shocking News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

भाच्याने मामाचा काढला काटा, थेट हत्याच...

point

विधवा महिलेसोबत अफेअरबाबत पत्नीला समजलं अन्..

point

पत्नीनेही केला मोठा कांड अन् नंतर जे घडलं..

Extra Marital Affaire Viral News : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊच्या बंथरा पोलीस स्टेशन हद्दीतील दरियापूर परिसरात धक्कादायक घटना घडली. एका रेल्वे कर्मचाऱ्याच्या हत्येमुळं खळबळ माजलीय. सिद्धी प्रसाद लोधी असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. पोलिसांनी दावा केला आहे की, रेल्वे कर्मचाऱ्याच्या हत्येच्या कटात पत्नी मंजू आणि तिचा भाचा आकाश वर्माचा हात आहे. आकाशने त्याचे मित्र संजय कश्यप सोबत मिळून प्लास्टिकच्या रस्सीने सिद्धीचा गळआ दाबून हत्या केली. त्यानंतर मृतदेह घराच्या मागे असणाऱ्या झाडीत फेकला. पोलिसांनी मंजू आणि आकाशला अटक केली आहे. तर आरोपी संजय फरार आहे.

बंथराच्या दरियापूर येथील रहिवासी सिद्धी प्रसाद लोधी आलमबाग स्टोरमध्ये चतुर्थ श्रेमी रेल्वे कर्मचारी होते. 25 मे रोजी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास सिद्धीचा मृतदेह घराच्या जवळ असलेल्या झाडीत सापडला. गावातील एका तरुणाने मृतदेह पाहून कुटुंबियांना आणि पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टसाठी पाठवला आणि आरोपी मंजूविरोधात गुन्हा दाखल केला.

हे ही वाचा >> भरधाव कार बंगल्याला धडकली, 5 जण जागीच ठार, लग्नावरुन येताना काळाचा घाला, नेमकं काय घडलं?

पोलीस तपासात खळबळजनक माहिती आली समोर

पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर आरोपी आकाशने सिद्धीच्या हत्येचा कट रचल्याचा कबूल केलं. त्याने पोलिसांना सांगितलं की, सिद्धी त्याचा मामा होता. तो सिध्दीच्या घरी येजा करायचा. याचदरम्यान मंजूसोबत त्याची मैत्री झाली. दोघांच्या मैत्रिचं रुपांतर प्रेमात झालं. सिद्धी मद्यपान करून जुगार खेळायचा. गावातील एका विधवा महिलेसोबत त्याचे अनैतिक संबंध होते. सिद्धीची त्याच्या मुलीवर वाईट नजर होती. 

रिपोर्टनुसार, सिद्धीचा काट काढण्यासाठी मंजूने आकाशला सुपारी दिली होती. आकाशने गोंडा येथील त्याचे मित्र संजय कश्यपला 40 हजार रुपयांचं अमिष दाखवून हत्येच्या कटात सहभागी केला. 24 मे रोजी मंजूने आकाशला फोनवर सांगितलं की, घरातील सर्व लोक लग्नाला गेले आहेत. त्यामुळे सिद्धीचा खून करण्याची ही योग्य संधी आहे. आकाश आणि संजयने सिद्धीच्या घरी जाऊन प्लास्टिकच्या रस्सीने त्याचा गळा दाबला.