Mumbai: लग्नात तब्बल 4.75 कोटींचे दागिने दिले, तरी सुनेला...
मुंबईतील दिंडोशी पोलिसांनी हुंड्यासाठी सूनेचा छळ केल्याप्रकरणी महिलेच्या सासरकडील तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेने तक्रार करत काय सांगितले? पाहा...
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
लग्नात 4.75 कोटींचे दागिने दिले तरी सुनेचा हुंड्यासाठी छळ
मुंबई पोलिसांकडून हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल...
सासरच्या तिघांविरोधात सुनेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
Mumbai News: वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर हुंड्यामुळे सुनांचा होत असलेल्या छळाच्या बऱ्याच घटना समोर येत आहेत. मुंबईसारख्या मोठ्या शहरात सुद्धा असं प्रकरण घडल्याचं समोर आलं आहे. हुंड्यासाठी सुनेचा छळ केल्याप्रकरणी मुंबईतील दिंडोशी पोलिसांनी महिलेच्या सासरकडील तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. महिलेने तिच्या सासरच्या मंडळींविरोधात तक्रार करत सांगितले की लग्नात हुंडा म्हणून पाऊणे पाच कोटींचे दागिने दिले होते आणि तरीसुद्धा सतत तिचा हुंड्यासाठी छळ केला जायचा.
सणाला महागड्या भेटवस्तू देण्यासाठी दबाव
महिलेने या प्रकरणी दिंडोशी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. या महिलेचं नाव श्रृंखला जैन असं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 2021 मध्ये श्रृंखलाचं गोवर्धन सोबत लग्न झालं होतं. लग्नानंतर ती तिच्या पती आणि सासरच्या मंडळींसोबत महालक्ष्मी येथे राहण्यासाठी गेली. श्रृंखलाने सांगितल्याप्रमाणे, तिच्या माहेरच्या लोकांवर प्रत्येक सणाला महागड्या भेटवस्तू देण्यासाठी सासरच्या मंडळीकडून दबाव टाकला जात होता.
शारीरिक आणि मानसिक छळ
श्रृंखला आणि गोवर्धनच्या लग्नाचा सगळा खर्च श्रृंखलाच्या वडिलांनीच केला असल्याचं तक्ररीत सांगितलं गेलं आहे. लग्नामध्ये तिच्या मुलीच्या कुटुंबियांकडून जवळपास पाऊणे पाच कोटींचे दागिने देण्यात आले होते. लग्नानंतर सुद्धा तिचा सासरी हुंड्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ केला जायचा.
हे ही वाचा: भर चौकात कोयते निघाले, दगड भिरकावले... बीडमध्ये गुन्हेगारांचा हैदोस सुरूच, नवा व्हिडीओ समोर
तसेच तिच्या सासरच्या मंडळींनी श्रृंखला गरोदर असताना काहीच काळजी न घेता तिला बऱ्याचदा उपाशी ठेवलं जात असल्याचं आरोप देखील केला आहे. नंतर तिला मुलगी झाल्यानंतर सुद्धा दु:ख व्यक्त करत श्रृंखलाचा आणखी छळ करण्यात येत होता. तसेच, लग्नात मिळालेले दागिने सुद्धा सासूने आपल्याजवळ ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. श्रृंखलला सासरी क्रेडिट आणि डेबिट कार्डचा वापर करण्यावर सुद्धा बंधने घालण्यात आली होती.










