बलात्काऱ्याला थेट गोळीच घातली, व्हायरल होणारी 'ही' महिला पोलीस अधिकारी आहे तरी कोण?
Crime News : उत्तर प्रदेशातील एका महिला पोलीस अधिकाऱ्याची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसते. लखनऊ येथील एका 4 वर्षीय चिमुरडीवर बलात्काराची घटना घडली होती. आरोपीचे नाव कमल किशोर असे असून आरोपी किशोर आणि पोलिसांमध्ये धरपकड झाली. यामध्ये पोलिसांनी आरोपीवर गोळीबार केला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
महिला पोलीस अधिकाऱ्याची सोशल मीडियावर चर्चा
बलात्कारप्रकरणात गोळीबार करणाऱ्या महिला अधिकारी, नेमकं प्रकरण काय?
Crime News : उत्तर प्रदेशातील एका महिला पोलीस अधिकाऱ्याची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसते. लखनऊ येथील एका 4 वर्षीय चिमुरडीवर बलात्काराची घटना घडली होती. आरोपीचे नाव कमल किशोर असे असून आरोपी किशोर आणि पोलिसांमध्ये धरपकड झाली. यामध्ये पोलिसांनी आरोपीवर गोळीबार केला होता. सोशल मीडियावर चर्चा आहे की, या एन्काऊंटरमध्ये महिला पोलीस अधिकारी सकीना खानचाही समावेश होता, अशा चर्चा आहेत. बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचाही एन्काऊंटर करण्यात आला होता. अशाच एका घटनेची पुनरावृत्ती घडली आहे.
हेही वाचा : बुध ग्रहाचा मिथून राशीत होणार प्रवेश, 'या' पाच राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार
या प्रकरणानंतर काही प्रसारमाध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली होती. त्या व्हिडिओमध्ये पोलीस महिला अधिकारी सकीना खानही होती. दरम्यान, सकीना खानवर एन्काऊंटरचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपाची सध्या जोरदार चर्चा होताना दिसत आहे. मात्र, या आरोपाबाबत कोणाताही खुलासा झाला नाही.
नेमकं काय घडलं होतं?
28 मे रोजी लखनऊ मडेगंज पोलीस ठाण्यात सूत्रांनी माहिती दिली की, आरोपी कमल पोलीस ठाणे परिसरातच लपला आहे. माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी आरोपीनेच शोध मोहिमेसाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर गोळीबार केला आहे.
प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी गोळीबार केला, या गोळीबारात आरोपी हा जखमी झाला आहे. यानंतर, आरोपीला तात्काळ पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी माहिती दिली की, आरोपी विरोधात अनेक कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत.










