12 वीत टॉपर, स्पर्धा परिक्षेत सतत अपयशी, शेवटी सबंध कुटुंबालाच संपवलं; काय होती तरुणाची व्यथा?

मुंबई तक

Crime News : बेरोजगारीमुळे कित्येक तरुण नैराश्याग्रस्त आयुष्य जगत असताना दिसत आहेत. या नैराश्येतून अनेकजण  टोकाचं पाऊल उचलतात. 12 वीत टॉप केलेल्या आणि सध्या स्पर्धा परिक्षेची तयारी करत असलेल्या दीपकने भयानक मार्ग निवडला. त्याला स्पर्धा परिक्षेत यश मिळत नसल्याने तो निराश होता. यातच त्याने आपल्या कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या केली. मृतांमध्ये आरोपीची आई कमलती धुर्वे, वडील राजू धुर्वे आणि धाकटा भाऊ दिलीप धुर्वे यांचा समावेश आहे. एवढेच नव्हे, तर या नराधमाने घरातील पाळीव मांजरीलाही मारून टाकले.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

12 वीत टॉपर, स्पर्धा परिक्षेत सतत अपयशी

point

शेवटी सबंध कुटुंबालाच संपवलं

point

काय होती तरुणाची व्यथा?

Crime News : बेरोजगारीमुळे कित्येक तरुण नैराश्याग्रस्त आयुष्य जगत असताना दिसत आहेत. या नैराश्येतून अनेकजण  टोकाचं पाऊल उचलतात. 12 वीत टॉप केलेल्या आणि सध्या स्पर्धा परिक्षेची तयारी करत असलेल्या दीपकने भयानक मार्ग निवडला. त्याला स्पर्धा परिक्षेत यश मिळत नसल्याने तो निराश होता. यातच त्याने आपल्या कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या केली. मृतांमध्ये आरोपीची आई कमलती धुर्वे, वडील राजू धुर्वे आणि धाकटा भाऊ दिलीप धुर्वे यांचा समावेश आहे. एवढेच नव्हे, तर या नराधमाने घरातील पाळीव मांजरीलाही मारून टाकले. या घटनेने संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून आरोपी रात्रभर त्या मृतदेहांच्या शेजारीच बसून होता. मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील ही घटना आहे.

हे ही वाचा : अहिल्यानगर : शाळेत नोकरी मिळवून देण्याचे आमिष, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षाचा 25 वर्षीय तरुणीवर बलात्कार

रात्रभर मृतदेहाजवळ बसून राहिला

 20 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री ही घटना घडली. आरोपी दीपक धुर्वे याने आपल्या 5 वर्षांच्या भाच्यावरही (विजय) हल्ला केला, मात्र तो मुलगा वेळीच लपल्याने त्याचे प्राण वाचले. सकाळी जेव्हा एक गावकरी काही कामासाठी त्यांच्या घरी गेला, तेव्हा त्याला घरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह दिसले. त्याने तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दरवाजा उघडला तेव्हा आतल्या भयानक दृश्यामुळे पोलीसही चक्रावून गेले.

12 वीत टॉपर

आरोपी दीपकची पार्श्वभूमी पाहिली तर तो अत्यंत हुशार विद्यार्थी होता आणि 12 वीत त्याने टॉप केले होते. गेल्या तीन वर्षांपासून तो सरकारी नोकरीसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. मात्र, यश मिळत नसल्याने आणि वाढत्या दबावामुळे तो नैराश्यात होता, अशी माहिती समोर आली आहे. तो मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याची शक्यता वर्तवली जात असून पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत. हत्येनंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून फॉरेन्सिक टीम घटनास्थळावरून पुरावे गोळा करत आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp