नवऱ्यानं टीव्हीचा आवाज कमी केला नाही, बायकोनं थेट चाकूनं भोसकलंच; नेमकं काय घडलं?

मुंबई तक

Crime News : आंध्र प्रदेशातील मंगलगिरी शहरात एका क्षुल्लक कारणावरुन पत्नीने पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घरात टीव्हीचा आवाज जास्त असल्यावरुन पती-पत्नीमध्ये वाद झाला आणि संतापलेल्या पत्नीने पतीवर चाकूने वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नवऱ्यानं टीव्हीचा आवाज कमी केला नाही

point

बायकोनं थेट चाकूनं भोसकलंच

point

नेमकं काय घडलं?

Crime News : आंध्र प्रदेशातील मंगलगिरी शहरात एका क्षुल्लक कारणावरुन पत्नीने पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घरात टीव्हीचा आवाज जास्त असल्यावरुन पती-पत्नीमध्ये वाद झाला आणि संतापलेल्या पत्नीने पतीवर चाकूने वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

हे ही वाचासांगली : पोटच्या दोन लेकरांना 20 हजाराला विकले, पाच दिवसांच्या मुलीची विक्री करताना आई सापडली

आवाज कमी करायला सांगितल्याने हत्या

मृताची ओळख २७ वर्षीय शेख अहमद अशी झाली असून तो व्यवसायाने एसी मॅकेनिक होता. अहमद आणि त्याची पत्नी मंगलगिरी येथील टिडको हाऊसिंग कॉलनीमध्ये वास्तव्यास होते. शनिवारी घरात टीव्ही सुरू असताना त्याचा आवाज खूप मोठा होता. अहमदने पत्नीला आवाज कमी करण्यास सांगितले, मात्र यावरुन दोघांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक सुरू झाली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि रागाच्या भरात पत्नीने घरातील चाकूने अहमदवर हल्ला केला.

उपचारादरम्यान मृत्यू

घटनेनंतर आरडाओरडा ऐकून आसपासचे नागरिक मदतीला धावले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अहमदला तातडीने विजयवाडा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp