दुसऱ्या धर्मातील मुलावर प्रेम केल्याचा राग, भावाने बहिणीला संपवलं, बाप म्हणाला, 'अशा मुलींना मारणं योग्यच'
Crime News : मिळालेल्या माहितीनुसार, रूपजहां आणि तिच्या घरापासून अवघ्या 400 मीटर अंतरावर राहणारा शिवम सैनी यांचे गेल्या एक वर्षापासून प्रेमसंबंध होते. शिवमच्या कुटुंबाचा या लग्नाला विरोध नव्हता, मात्र रूपजहांचे कुटुंबीय धर्माच्या नावाखाली या नात्याच्या विरोधात होते. दोन महिन्यांपूर्वीच या दोघांनी गुपचूप लग्न केल्याचा दावा शिवमच्या आईने केला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
दुसऱ्या धर्मातील मुलावर प्रेम केल्याचा राग
भावाने बहिणीला संपवलं
बाप म्हणाला, 'अशा मुलींना मारणं योग्यच'
Crime News : संभल (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातल्या संभल जिल्ह्यातील मतावली पट्टी जग्गू गावात सध्या स्मशान शांतता पसरली आहे. 18 वर्षांच्या रूपजहां आणि शिवम सैनी यांच्या अपूर्ण राहिलेल्या लव्हस्टोरीचा अंत रक्ताच्या नात्यांनीच केला आहे. ज्या ओढणीने बहिणीचे रक्षण करायला हवे होते, त्याच ओढणीने भावाने बहिणीचा श्वास रोखला.
काय आहे नेमकं प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, रूपजहां आणि तिच्या घरापासून अवघ्या 400 मीटर अंतरावर राहणारा शिवम सैनी यांचे गेल्या एक वर्षापासून प्रेमसंबंध होते. शिवमच्या कुटुंबाचा या लग्नाला विरोध नव्हता, मात्र रूपजहांचे कुटुंबीय धर्माच्या नावाखाली या नात्याच्या विरोधात होते. दोन महिन्यांपूर्वीच या दोघांनी गुपचूप लग्न केल्याचा दावा शिवमच्या आईने केला आहे.
पोलीस ठाण्यातील पंचायत आणि पैशांचा व्यवहार
बुधवारी रूपजहां आणि शिवम घरातून निघून गेले होते आणि सुरक्षेसाठी पोलीस ठाण्यात पोहोचले होते. तिथे झालेल्या पंचायतीत मुलीने आपण सज्ञान असून शिवमसोबत राहू इच्छिते, असे स्पष्ट सांगितले. मात्र, गावातील सरपंचाने मध्यस्थी करून "प्रकरण मिटवण्यासाठी" ३ लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप मुलीच्या काकांनी केला आहे. त्यापैकी दीड लाख रुपये दिल्यानंतर मुलीला 'सगळं ठीक होईल' असं सांगून घरी परत आणण्यात आले.
हेही वाचा : अक्षता पडायला काहीच तास बाकी होते, दोघींनी संपवलं जीवन, मामाने केला धक्कादायक आरोप










