आधी डोळ्यात तिखट टाकलं, मग बॅटरी अन् विटेनं डोकं ठेचलं; सुट्टीवर आलेल्या लष्करी जवानाने प्रेयसीच्या भावाला संपवलं

मुंबई तक

Crime News : एका लष्करी जवानाने प्रेयसीच्या भावाचा निर्घृण खून केल्याची घटना समोर आली आहे. अर्जुन सिंह असं 35 वर्षीय मृत व्यक्तीचं नाव आहे. 14 फेब्रुवारी रोजी एका गव्हाच्या शेतात अर्जुन यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडला होता. या प्रकरणी पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला असून, ही हत्या अर्जुनच्या मित्रानेच केल्याचे समोर आले आहे. आरोपी भानु उर्फ दुरुपद हा भारतीय सैन्यात कार्यरत असून सुट्टीवर घरी आला असताना त्याने हे क्रूर कृत्य केले.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आधी डोळ्यात तिखट टाकलं, मग बॅटरी अन् विटेनं डोकं ठेचलं

point

सुट्टीवर आलेल्या लष्करी जवानाने प्रेयसीच्या भावाला संपवलं

Crime News : एका लष्करी जवानाने प्रेयसीच्या भावाचा निर्घृण खून केल्याची घटना समोर आली आहे. अर्जुन सिंह असं 35 वर्षीय मृत व्यक्तीचं नाव आहे. 14 फेब्रुवारी रोजी एका गव्हाच्या शेतात अर्जुन यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडला होता. या प्रकरणी पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला असून, ही हत्या अर्जुनच्या मित्रानेच केल्याचे समोर आले आहे. आरोपी भानु उर्फ दुरुपद हा भारतीय सैन्यात कार्यरत असून सुट्टीवर घरी आला असताना त्याने हे क्रूर कृत्य केले.

हे ही वाचा : अहिल्यानगर : पोटच्या मुलानेच आईला संपवलं, चाकू आणि अडकित्त्याच्या सहाय्याने हत्या, दोन तास मृतदेहाजवळच खेळत बसला

वादाचे कारण आणि कट

पोलिस तपासात समोर आले की, आरोपी भानु हा अर्जुनच्या बहिणीशी वारंवार फोनवर बोलायचा. एके दिवशी अर्जुनने आपल्या बहिणीच्या हातातील फोन हिसकावून घेतला आणि भानुला कडक शब्दांत फटकारले. आपल्या प्रेमात अडथळा ठरल्यामुळे आणि अपमानाचा बदला घेण्यासाठी भानुने अर्जुनच्या हत्येचा कट रचला. अर्जुन रात्रीच्या वेळी शेतात एकटाच झोपायला जातो, हे भानुला ठाऊक होते. याच संधीचा फायदा घेण्याचे त्याने ठरवले.

डोळ्यात चटणी टाकून निर्घृण हत्या

13 आणि 14 फेब्रुवारीच्या मध्यरात्री भानु गुपचूप शेतात पोहोचला. आवाजामुळे अर्जुनला जाग आली असता, आरोपीने आधी त्याच्या डोळ्यात तिखट टाकले जेणेकरून त्याला काहीही दिसणार नाही. त्यानंतर जवळच पडलेल्या विटांनी आणि टॉर्चने अर्जुनच्या डोक्यावर सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात अर्जुनचा जागीच मृत्यू झाला. हत्येनंतर आरोपीने एक बनाव रचला; त्याने अर्जुनच्या फोनवरून त्याच्या भावाला कॉल केला आणि 'जंगली प्राण्यांनी हल्ला केला आहे' असे सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.

हे वाचलं का?

    follow whatsapp