मुंबई जवळच्या 'या' जिल्ह्यात लव्ह जिहाद?, बनावट ‘हिंदू’ ओळखीमुळे लग्न अन्..

मुंबई तक

Palghar Crime: बीड जिल्ह्यातील राजू सिकंदर शेख या आरोपीने “अजय म्हस्के” या बनावट हिंदू नावाने इंस्टाग्रामवर अकाउंट तयार करून 29 वर्षीय महिलेशी लग्न करून तिची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे.

ADVERTISEMENT

29 year old woman alleges love jihad in palghar district near mumbai accused deceives young woman into marriage using a fake hindu identity
Plaghar Crime News
google news

पालघर: पालघरमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवणुकीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बनावट ओळख वापरून एका महिलेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिची आर्थिक आणि मानसिक फसवणूक केल्याचा आरोप आहे. (29 year old woman alleges love jihad in palghar district near mumbai accused deceives young woman into marriage using a fake hindu identity)

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील राजू सिकंदर शेख या आरोपीने “अजय म्हस्के” या बनावट हिंदू नावाने इंस्टाग्रामवर अकाउंट तयार केले. त्याद्वारे त्याने 29 वर्षीय महिलेशी ओळख वाढवली आणि तिला लग्नाचे आमिष दाखवत विश्वास संपादन केला.

हे ही वाचा>> बीड : 1143 शब्दांची सुसाईड नोट, तरुणाचा पत्नीकडून अनन्वित छळ, अन् काळीज पिळवटणारी गझलही केली शेअर

यानंतर आरोपीने पीडितेला मंदिरात नेऊन खोटे लग्न केल्याचा बनाव केला. सहा महिन्यांच्या काळात तिच्याकडून सुमारे अडीच लाख रुपये उकळल्याचा आरोप आहे. इतकेच नव्हे, तर आरोपीच्या पत्नीने अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आणखी दोन लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा देखील खळबळजनक आरोप केला आहे.

या प्रकरणी घाबरलेल्या पीडित महिलेने केळवे सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सापळा रचून आरोपीला पुण्यातून अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून या प्रकरणात फसवणूक, ब्लॅकमेल आणि खंडणीचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हे वाचलं का?