बुध ग्रहाचा मिथून राशीत होणार प्रवेश, 'या' पाच राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार

astrology 2025 : ज्योतिषशास्त्राने दिलेल्या माहितीनुसार, 10 जून 2025 रोजी बुध हे मिथून राशीत प्रवेश करणार आहे. बुधाला ज्योतिषशास्त्रात चांगलं महत्त्व प्राप्त झालं आहे. बुध ग्रहाला बुद्धिमत्ता, संवाद, शिक्षण आणि व्यवसायाचा कारक मानले जाते

ADVERTISEMENT

google news
Astrology

1/6

ज्योतिषशास्त्राने दिलेल्या माहितीनुसार, 10 जून 2025 रोजी बुध हा मिथून राशीत प्रवेश करणार आहे. दरम्यान, बुधाला ज्योतिषशास्त्रात चांगलं महत्त्व प्राप्त झालं आहे. बुध ग्रहाला बुद्धिमत्ता, संवाद, शिक्षण आणि व्यवसाय कारक मानले जाते. यामुळे करिअरमध्ये अगदी धीम्या गतीने प्रगती होईल. 

Astrology

2/6

वृषभ राशी

वृषभ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत राहणार आहे. वृषभ राशींचे लोक कपडे आणि दागिण्यांची विक्री करु शकतात. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला असणार आहे. विशेषकरुन स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना चांगलं यश मिळण्याची शक्यता आहे. गुरुच्या युतीमुळे, जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळणार आहे. बोनससारखे आर्थिक लाभ होणार आहेत. 
 

Astrology

3/6

सिंह राशी

सिंह राशीच्या लोकांचे नशीब फळफळणार आहे. थांबलेली प्रगती किंवा सतत येणाऱ्या अपयशावर अंकुश लावत हे लोक चांगला मार्ग स्वीकारतील. नोकरदार वर्गाचं प्रमोशन होणार असून वेतनात वाढ होईल. कुटुंबियांकडून चांगला फायदा मिळणार आहे. हे संक्रमण केवळ उत्पन्नातच वाढ करणार नाही,तर पैसे बचतीसाठीही चांगला फायदा होणार आहे. 
 

Astrology

4/6

कन्या राशी

त्याचप्रमाणे कन्या राशीतील लोकांना करिअर आणि सामाजिक प्रतिष्ठा लाभणार आहे. तुमचे बॉस आणि वरिष्ठ मंडळी तुमच्या कामाची प्रशंसा करतील. जबाबदाऱ्या वाढणार आहे. ज्यामुळे विस्ताराचं स्वरुप प्राप्त होणार आहे. 
 

Astrology

5/6

वृश्चिक राशी

वृश्चिक राशीच्या लोकांना कर्ज मिळेल. बक्षिस स्वरुपात पैसे मिळण्याची शक्यता आहे. प्रलंबित कामे पूर्ण होऊन उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होणार आहेत. आपल्याला जोखीम घेतली तरीही आपला तोटा होणार नाही. त्यामुळे हा काळ जोखीम घेण्यासाठी अनुकूल असणार आहे. 
 

Astrology

6/6

मकर राशी

मकर राशीसाठी बुध सहाव्या घरात असणार आहे. यामुळे मकर राशीच्या लोकांना कष्टाचं फळ मिळणार आहे. नोकरीत प्रमोशन आणि चांगल्या कामगिरीमुळे तुमची ओळख वाढेल. कला, साहित्य आणि लेखकांना चांगलं यश मिळेल. पुरस्कार प्राप्त होईल तसेच पुस्तकही प्रकाशित होईल. 

रिलेटेड चित्र गॅलरी