हुक्का पॉट आढळल्याने पोलिसांनीच तरुणांना घाटात लुटले, गुन्हा दाखल करण्याची धमकी देत 28 हजार उकळले

मुंबई तक

Pune Crime News : पुण्यात वाढत्या गुन्हेगारीने थैमान घातल्याच्या दररोज घटना घडताना दिसतात. मात्र, आता पुणे पोलिसांच्या भूमिकेवर आणि कर्तव्यावर अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसतात. कोंढवा पोलीस ठाण्यातील पोलिसावर खंडणी घेतल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक दोन नाही,तर तब्बल 28 हजार रुपयांच्या खंडणीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली

ADVERTISEMENT

Pune Crime News Kondhwa police robbed youths at the ghat after finding hookah pot
Pune Crime News Kondhwa police robbed youths at the ghat after finding hookah pot
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कोंढवा पोलीस ठाण्यातील पोलिसावर खंडणी घेतल्याचा गुन्हा दाखल

point

पोलीस अधिकारी 28 हजार रुपयांच्या खंडणीच्या आरोपाखाली अटक

Pune Crime News : पुण्यात वाढत्या गुन्हेगारीने थैमान घातल्याच्या दररोज घटना घडताना दिसतात. मात्र, आता पुणे पोलिसांच्या भूमिकेवर आणि कर्तव्यावर अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसतात. कोंढवा पोलीस ठाण्यातील पोलिसावर खंडणी घेतल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक दोन नाही,तर तब्बल 28 हजार रुपयांच्या खंडणीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. दरम्यान, विक्रम लक्ष्मण वडतीले असे आरोपी पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. ही घटना  5 जून रोजी सात ते साडेनऊच्या दरम्यान घडली. 

हेही वाचा : पतीला नव्हती आवडत सावळ्या रंगाची पत्नी, पत्नीसोबत केलं 'असं' काही की...

नेमकं प्रकरण काय? 

तरुणाच्या बॅगेत हुक्का पॉट आढळल्यानंतर पोलीस अधिकाऱ्याने तब्बल 28 हजार रुपयांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 

तक्रारदार व्यक्ती हा चेन्नई येथील आहे. तो आपल्या मित्रासोबत बोपदेव घाटातील परिसरात फिरण्यासाठी आला असता ही घटना घडली आहे. यावेळी त्यांच्याकडे हुक्का पॉट आढळला असताना संबंधित पोलीस अधिकाऱ्याने 30 हजार रुपये खंडणीची मागणी केल्याचा आरोप तक्रारदाराकडून होत आहे. 

त्यानंतर त्याचा मित्र केदार जाधवने तडजोड करुन याच्या गुगल पे वरती 28 हजार रुपये पाठवले. या प्रकरणात आता कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर विक्रम लक्ष्मण वडतीले याला सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. 

हेही वाचा : चोराच्या उलट्या बोंबा! पोलीस असल्याची खोटी ओळख, लंपास केले 2.89 कोटी नंतर...

पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा करत माहिती दिली आहे. बापदेव घाटात नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा असते. याच ठिकाणी विक्रम यांना ड्यूटी देण्यात आली होती. त्याचवेळी हा सर्व प्रकार घडला आहे. या घटनेवर पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांनी घटनास्थळी जाऊन भेट दिली. या तक्रारीत तथ्य दिसून आल्यानंतर संबंधित आरोपीला निलंबित केलं आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp