प्लास्टिक सर्जरी करून परदेशी महिलांचा चेहरा बदलायचा..एजंट-डॉक्टर फरार, 'असा' झाला सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!

मुंबई तक

Shocking Viral News : उत्तरप्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एका धक्कादायक घटनेमुळं खळबळ माजली आहे. हाय प्रोफाईल परदेशी सेक्स रॅकेटचा पदार्फाश करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

Prostitute Racket Busted Viral News
Prostitute Racket Busted Viral News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

डॉ. विवेक गुप्ताने परदेशी महिलांचा चेहरा मोहराच बदलला

point

देहव्यापार करणाऱ्या परदेशी महिलांचा झाला पर्दाफाश

point

लखनऊमध्ये नेमकं घडलं तरी काय?

Shocking Viral News : उत्तरप्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एका धक्कादायक घटनेमुळं खळबळ माजली आहे. हाय प्रोफाईल परदेशी सेक्स रॅकेटचा पदार्फाश करण्यात आला आहे. या शहरातील एका प्रसिद्ध सर्जनचा या घटनेत सहभाग असल्याचं समोर आलं आहे. डॉ. विवेक गुप्ता असं या सर्जनचं नाव आहे. आरोप करण्यात आला आहे की, गुप्ताने उज्बेकिस्तानच्या दोन महिला - होलिडा आणि निलोफरची प्लास्टिक सर्जरी करून त्यांचा चेहरा बदलला. असं यासाठी केलं जेणेकरून पासपोर्टशिवाय आणि व्हिसाच्या माध्यमातून भारतात बेकायदेशीरपणे राहता येईल. तसच देहव्यापाराचा काळा बाजारही त्यांना सुरु करता येईल. 

अर्जुन राणा नावाच्या व्यक्तीने डॉ. विवेक गुप्ताला संपर्क केला आणि..

21 जूनला परदेशी क्षेत्रीय पंजीकरण कार्यालय (एफआरआरओ) आणि लखनऊ पोलिसांच्या संयुक्त कारवाईमुळे या दोन्ही महिलांना ओमेक्स हजरतगंजच्या एका फ्लॅटमधून अटक केलं गेलं. तपासात उघडकीस आलं की, उज्बेकिस्तानच्या महिलांना लखनऊमध्ये राहण्याची व्यवस्था आणि त्यांचा चेहरा बदलण्याचं काम डॉ. विवेक गुप्ताने अर्जुन राणा नावाच्या व्यक्तीच्या सांगण्यावरून केलं होतं.
अर्जुन राणा माध्यमकर्मी असल्याचं सांगतो. तो उज्बेकिस्तानी गँग लीडर लोयोला नावाच्या महिलेचा पती आहे.

हे ही वाचा >> 11 महिला आणि 12 पुरुष... सुरू होतं भलतंच काही, पोलिसांची एंट्री अन् खेळच खल्लास...

लोयोलो विरुद्ध आधीपासूनच उज्बेकिस्तानमध्ये लुक आऊट नोटिस जारी केलं आहे. तिथून फरार झाल्यानंतर त्याने भारतात सेक्स रॅकेट सुरु केलं. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी डॉ. विवेक गुप्ताचा लखनऊच्या गोमतीनगर आणि सुल्तानपूर रोडवर क्लिनिक आहे. पोलीस असाही तपास करत आहेत की, या डॉक्टरांनी आतापर्यंत कोणकोणत्या लोकांची ओळख लपवण्यासाठी प्लास्टिक सर्जरी केली आहे. सर्जरीनंतर उज्बेकिस्तानच्या महिलांचा चेहरा बदलला. जेणेकरून त्या परदेशी वाटणार नाहीत.

खुलासा झाल्यानंतर तपास एजन्सीही सतर्क झाल्या. याआधी सुशांत गोल्फ सिटी पोलीस ठाण्यात आरोपी डॉक्टर विवेक गुप्ता आणि अर्जुन राणा विरोधात विदेशी अधिनियमसह अनेक गंभीर कलमांचे गुन्हे दाखल केले आहेत. एफआरआरओच्या टीमने त्यांचं नेटवर्क शोधणं सुरु केलं. पोलीस या गँगचे अन्य ठिकाण आणि परदेशी कनेक्शनचा तपास करत आहेत. 

हे ही वाचा >> बॉयफ्रेंडला दाखवायची जलवा, पत्नीने पाठवला तिच्या अश्लील चाळ्यांचा Video! पाहिल्यावर पतीने थेट...

हे वाचलं का?

    follow whatsapp