उधारीवर सिगारेट न दिल्याने अल्पवयीन मुलाने दुकानदार महिलेवर सपासप...अन् महिला जागीच...

Chanadrapur Crime : चंद्रपर शहरातील रमाईनगर भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सिगारेट उधारीवर न दिल्याने अल्पवयीन मुलाने महिलेवर धारदार शस्त्राने सपासप वार करत खून केला. या घटनेनं चंद्रपूर शहर हादरून गेले आहे.

chanadrapur crime
chanadrapur crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

उधारीवर सिगारेट न दिल्याने दुकानदार महिलेचा खून

point

चंद्रपूरात हादरवून टाकणारी घटना

Chanadrapur Crime : चंद्रपूर शहरातील रमाईनगर भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. सिगारेट उधारीवर न दिल्याने अल्पवयीन मुलाने महिलेवर धारदार शस्त्राने सपासप वार करत खून केला. या घटनेनं चंद्रपूर शहर हादरून गेले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे 15 जून रोजी ही घटना घडली आहे. कविता रायपूरे (वय 35) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणात पोलिसांनी लक्ष घालत खूनाचा खुलासा केला आहे. 

हेही वाचा :  मुंबई हादरली! 10 वर्षाच्या मुलीवर आईच्याच बॉयफ्रेंडनं केलं लैंगिक शोषण, गुप्तांगात स्क्रू ड्रायव्हर टाकत व्हिडिओ बनवला

चंद्रपूर शहरातील राजुरा येथे दुकानदार महिलेनं अल्पवयीन मुलाला उधारीवर सिगारेट देण्यास नकार दिला. यामुळे अल्पवयीन मुलाने महिलेचा खून केला आहे. या घटनेचा पाच दिवसानंतर उलगडा झाला आहे. या क्षुल्लक कारणाने मुलाने टोकाचे पाऊल उचलले आणि चंद्रपूरात एकच खळबळ उडाली. 

नेमकं काय घडलं? 

कविता रायपुरे यांचे रमाबाईनगर येथे किराणाचे दुकान होते. 15 जून रोजी अल्पवयीन मुलगा त्यांच्या दुकानात आला आणि उधारीवर सिगारेटची मागणी केली. मुलाकडे पैसे नसल्याने त्यांनी सिगारेट देण्यास नकार दिला. उधारीवर सिगारेट न दिल्याचा राग मनात ठेवत रात्री 12 वाजताच्या सुमारास घरात कोणी नसल्याचे पाहून आरोपी अल्पवयीन मुलगा घराच्या सुरक्षा भिंतीवरून उडी मारून आत आला. तेव्हा त्याने महिलेवर धारदार शस्त्राने सपासप वार केले. यावेळी कविता रायपूरे ठार झाल्या. यानंतर आरोपी मुलाने घटनास्थळावरून पळ काढला. 

संबंधित घटना उघडकीस आल्यानंतर राजुरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरु केला. या घटनेदरम्यान, अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान, मोबाईल लोकेशनच्या मदतीने आरोपी मुलाला ताब्यात घेतलं आहे. आरोपी विरोधात 332 (ब ), 103 (1) या कलमान्वये गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

हेही वाचा : 30 वर्षानंतर 'नवपंचम राजयोग' 'या' राशीच्या लोकांचं नशीब पालटणार

या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अनेक ठिकाणी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. या प्रकरणात 40 हून अनेक संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी धारदार शस्त्रही ताब्यात घेतलं आहे.  

हे वाचलं का?

    follow whatsapp