मुंबई हादरली! 10 वर्षाच्या मुलीवर आईच्याच बॉयफ्रेंडनं केलं लैंगिक शोषण, गुप्तांगात स्क्रू ड्रायव्हर टाकत व्हिडिओ बनवला

मुंबई तक

Mumbai Crime News : मुंबईतील जोगेश्वरीमध्ये मन सुन्न करून टाकणारी घटना घडली आहे. एका 10 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण केलं. तिच्या गुप्तांगात स्क्रू ड्रायव्हर टाकत तिच्यावर अमानुषपणे अत्याचार करण्यात आले. ही घटना 15 जून रोजी जोगेश्वरीच्या मेघवाडी येथे घडली आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Crime News
Mumbai Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईतील जोगेश्वरीत धक्कादायक प्रकार

point

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

point

आईच्या बॉयफ्रेंडचं हैवानी कृत्य

Mumbai Crime News : मुंबईतील जोगेश्वरीमध्ये मन सुन्न करून टाकणारी घटना घडली आहे. एका 10 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण कऱण्यात आलं. तिच्या गुप्तांगात स्क्रू ड्रायव्हर टाकत तिच्यावर अमानुषपणे अत्याचार करण्यात आलेत. ही घटना 15 जून रोजी जोगेश्वरीच्या मेघवाडी येथे घडली आहे. आरोपीवर मेघवाडी पोलीस ठाण्यात एफआरआय दाखल करण्यात आला आहे. 

हेही वाचा : 30 वर्षानंतर 'नवपंचम राजयोग' 'या' राशीच्या लोकांचं नशीब पालटणार

आईच्याच बॉयफ्रेंडनं केलं लैंगिक शोषण

आरोपी हा दुसरा तिसरा कोणीही नसून पीडितेच्या आईचा बॉयफ्रेंड असल्याची माहिती समोर आली. 24 वर्षीय तरुणाने केलेल्या या कृत्यामुळे मुंबई हादरून गेली आहे. मेघवाडी पोलिसांनी आरोपी आणि प्रेयसीवर (पीडितेची आई) पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून दोघांनाही अटक केली आहे. 

पीडितेची आई एका कॅटरिंग सर्व्हिसमध्ये सुपरवायझर म्हणून काम करते. तिचा बॉयफ्रेंडही तिच्या हाताखाली काम करायचा. ते दोघेही एकाच चाळीत राहायचे. आई घरात नसल्याची संधी साधून आरोपीने 15 जून रोजी चिमुरडीवर अमानुषपणे अत्याचार केला. तिच्या गुप्तांगात स्क्रू ड्रायव्हर घालतानाचा व्हिडिओ देखील शूट केला. 

"जर कोणाला काही सांगितलंस तर.."

दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी माहिती दिली की, आरोपीने पीडितेवर धारदार शस्त्राने हल्ला केला. "जर कोणाला काही सांगितलंस तर व्हिडिओच व्हायरल करेन", अशी धमकीही दिली. हे घडलेलं हैवानी कृत्य पीडितेनं आपल्या आईला सांगितलं आणि तिने पोलिसांत तक्रार दाखल केली. 

हेही वाचा : निवृत्त शिक्षकाला अर्ध्या कोटीला फसवलं...पैशांचा पाऊस आणि दुप्पट परताव्याच्या नादात कसा गंडा घातला?

मेघवाडी पोलिसांनी बीएनएस कलम 64(1), 64(2)(i),115,352,आणि  31(3), पोक्सो कायद्याच्या कलम 4, 6, 8, आणि 12 आणि आयटी कायद्याच्या कलम 66E आणि 67Bअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले आणि दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. 

हे वाचलं का?

    follow whatsapp