निवृत्त शिक्षकाला अर्ध्या कोटीला फसवलं...पैशांचा पाऊस आणि दुप्पट परताव्याच्या नादात कसा गंडा घातला?

मुंबई तक

पैशांचा पाऊस सांगून लोकांना गंडवायचा, मध्येच म्हणायचा अडथळा आला आणि पूजा थांबवायचा. सिनेमात्या कहाणीलाही लाजवेल अशी या फसवणूक करणाऱ्या ठगाटी कहाणी ऐकूण पोलीसही चक्रावले आहेत.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

निवृत्त शिक्षकाला अर्ध्या कोटीला गंडा घातला

point

पैशांच्या पावसाच्या नादात सगळंच गेलं...

जालना : पैशाच्या पावसाचं आमिष आणि पैसे दुप्पट करण्याचं खोटे आश्वासन फसवणुकीचा भला मोठा प्रकार जालन्यात घडलाय. जालना येथील रतन आसाराम लांडगे याने बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील निवृत्त शिक्षक रामेश्वर उबाळे यांची 46 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी रतन लांडगे याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीच जादू-टोना करून एक लाख रुपये एक कोटीत बदलण्याचा दावा करत फसवणूक केल्याप्रकरणी रतन लांडगे याला 18 जून रोजी तालुका जालना पोलिसांनी अटक केली होती. आता त्याचा आणखी एक फसवणुकीचा कारनामा समोर आला आहे.

कशी झाली फसवणूक?

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील निवृत्त शिक्षक रामेश्वर उबाळे यांची जालना बसस्थानकावर एका व्यक्तीशी ओळख झाली. या व्यक्तीने पैशाचे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून उबाळे यांना जालना येथील रतन आसाराम लांडगे याच्या घरी नेलं. रतन लांडगे आणि त्याच्या साथीदाराने उबाळे यांना विश्वासात घेण्यासाठी पूजा-पाठ आणि जादू-टोण्याचा खोटा ड्रामा रचला.

हे ही वाचा >> "आई मी विष पिलंय, माझा मृतदेह 'इथून' घेऊन जा...", पुण्यात युवकानं स्वत:ला संपवलं, थरकाप उडवणारा घटनाक्रम

यावेळी त्यांनी पैशाचा पाऊस पाडण्याचा दिखावा केला आणि उबाळे यांच्याकडून 46 लाख रुपये घेतले. त्यानंतर, पूजेमध्ये अडथळा येत असल्याचं खोटं कारण सांगून पूजा बंद करण्यात आली. उबाळे यांना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी पैसे परत मागितले, पण रतन लांडगे आणि त्याच्या साथीदाराने पैसे परत करण्यास नकार दिला.

आधीच एकाला फसवल्याप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात आरोपी

दरम्यान, या प्रकरणी रामेश्वर उबाळे यांनी सदर बाजार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी रतन लांडगे याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. सध्या रतन लांडगे तालुका जालना पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, रतन लांडगे याच्या साथीदाराचाही शोध घेतला जात आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp