बॉयफ्रेंड नंतर त्याच्या ड्रायव्हरसोबत अनैतिक संबंध, पतीला सोडून इतर दोघांसोबत... 3 मुलांच्या आईचे 'ते' कृत्य!
Crime News: पाटणामध्ये एका महिलेचे पतीला सोडून इतर दोन पुरुषांसोबत अनैतिक संबंध ठेवले होते. पण याच प्रकरणात तिने तिसऱ्या प्रियकराची हत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच समो आली आहे.
ADVERTISEMENT

पाटणा (बिहार): प्रेमाच्या नादात आपल्याच व्यक्तीची हत्या करण्याच्या घटना सध्या देशभर चर्चेत आहेत. राजा रघुवंशीच्या हत्येचे प्रकरण अद्याप पूर्णपणे उलगडलेले नाही. हत्येचा आरोप असलेली पत्नी सोनम रघुवंशीबद्दल दररोज नवीन खुलासे होत आहेत. याच दरम्यान, बिहारमधील पटना येथून एका महिलेने तिच्या प्रियकराची हत्या केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे दुसऱ्या प्रियकराची हत्या करण्यासाठी महिलेने पहिल्या प्रियकराची मदत घेतली.
आरोपी महिला विवाहित आहे. तिला 3 मुले देखील आहेत. तथापि, ती घटस्फोट न घेता सुमारे 12 वर्षांपासून तिच्या पतीपासून वेगळी राहत होती आणि दोन तरुणांसोबत तिचे अनैतिक संबंध होते. संपूर्ण प्रकरणातील चौकशीच्या आधारे पोलिसांनी हत्येचा आरोप असलेली महिला, तिचा पहिला प्रियकर आणि प्रियकराच्या मित्राला अटक केली आहे. सध्या या प्रकरणात तपास सुरू आहे.
हे ही वाचा>> 11 महिला आणि 12 पुरुष... सुरू होतं भलतंच काही, पोलिसांची एंट्री अन् खेळच खल्लास...
पतीपासून तीन मुले, नंतर दुसऱ्यासोबत 14 वर्षे प्रेम, तिसऱ्यासोबत 5 वर्षे...
ही कहाणी खरं तर पूर्णपणे फिल्मी आहे. बिहारची राजधानी पाटणा येथे गुडिया नावाच्या महिलेचे लग्न झाले होते. तिला तीन मुलंही होती. नंतर ती तिच्या पतीपासून वेगळी झाली. त्यानंतर ती दुसऱ्या पुरुषाच्या प्रेमात पडली. ज्याच्यासोबत तिचे अनैतिक संबंध देखील होते. त्या काळात तिची नजर तिच्या प्रियकराच्या ड्रायव्हरवर पडली. ये-जा करताना ती ड्रायव्हरशी बोलू लागली. लवकरच ती ड्रायव्हरच्या प्रेमात पडली. सुमारे 8 वर्षे प्रियकराशी अनैतिक संबंध ठेवल्यानंतर, ती ड्रायव्हरवरही प्रेम करू लागली. म्हणजेच हे तिचे तिसरे प्रेम होते.
दुसऱ्या प्रियकरापासून वेगळे होण्याचा आग्रह
ती सुमारे 5 वर्षे ड्रायव्हरसोबत होते. तिचे त्याच्याशी देखील अनैतिक संबंध होते. या काळात, ड्रायव्हर तिचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड करायचा. भविष्यात तो या व्हिडिओंचा कसा वापर करू शकतो याची तिला कल्पना नव्हती. पण, 5 वर्ष प्रेमात पडल्यानंतर, ती ड्रायव्हरपासून वेगळे होण्याचा विचार करू लागली. ती त्याच्यापासून दूर राहू लागी.