'सोनमचे तर मुलींशी संबंध...', राजा रघुवंशीच्या ज्योतिषाचार्यांनी खळबळच उडवली!
Raja Raghuwanshi crime : राजा रघुवंशीबाबत ज्योतिषाने एक धक्कादायक दावा केला. ज्योतिष म्हणाले की, सोनमचे समलैंगिक संबंध असू शकतात. दरम्यान, ज्योतिषाने आतापर्यंत केलेले सर्व दावे हे खरे आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

राजा रघुवंशीच्या हत्येप्रकरणात मोठा ट्विस्ट

सोनमचे मैत्रिणीशी समलैंगिक संबंध?
Raja Raghuwanshi crime : राजा रघुवंशीच्या हत्येप्रकरणात मेघालय न्यायालयाने गुरूवारी आरोपी पत्नी सोनम रघुवंशी आणि राज कुशवाह यांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली. शिवाय, इतर आरोपी आकाश राजपूत, विशाल सिंह चौहान आणि आनंद यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. अशातच ज्योतिषाने राजा रघुवंशीबाबत एक धक्कादायक दावा केला. ज्योतिष म्हणाले की, सोनमचे समलैंगिक संबंध असू शकतात. दरम्यान, ज्योतिषाने आतापर्यंत केलेले सर्व दावे हे खरे आहेत.
हेही वाचा : हनिमूनच्या दिवशी पती जवळ आला, तेव्हाच पत्नीला झाली पुतण्याची आठवण अन्...
राजाच्या कुटुंबाचे म्हणणे आहे की, ज्योतिषी अजय दुबे यांनी त्यांच्या कुटुंबाबाबत केलेली अनेक भाकितं खरी ठरली आहेत. राजा रघुवंशी हत्याकांडात ज्योतिषी म्हणाले की, राजाच्या कुटुंबाने राजाची कुंडली सोनमच्या कुंडलीशी जुळवली असता, काही अंशी खरी परिस्थिती समोर आली.
राजाच्या कुटुंबाचे प्रश्न आणि ज्योतिषाची उत्तरे
ज्योतिषानं राजाच्या कुटुंबाला प्रश्न केला की, राजाची हत्या झालीये, त्याची पत्नी सोनम कुठे आहे?
त्यावर पंडित यांनी उत्तर दिलं की, सोनम जिवंत आणि सुरक्षित आहे.