Crime : वडिलांच्या गर्लफ्रेंडला बेदम मारलं अन् जिवंत जाळलं, कारण…

मुंबई तक

ADVERTISEMENT

fathers girlfriend beating and fire now police arrested
fathers girlfriend beating and fire now police arrested
social share
google news

A boy Beaten and fire Stepmom : जगभरात रविवारी 14 मे ला मदर्स डे (Mothers Day) साजरा करण्यात आला. या दिवसानिमित्त अनेकांनी आपल्या सोशल मीडियावर आईचे फोटो पोस्ट करून तिला शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र मदर्स डे नंतरच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुलाने (Boy)आपल्या सावत्र आईलाच (Stepmom)बेदम मारहाण करून जीवंत जाळल्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडलीय. या घटनेनंतर मुलाविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतले आहे. नेमकी हा घटनाक्रम काय आहे? हे जाणून घेऊयात. (fathers girlfriend beating and fire now police arrested a boy and jailed)

ADVERTISEMENT

न्युयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, पीडित महिला म्हणजेच सावत्र आई आरोपींच्या वडिलांना डेट करत होती. या महिलेचे वय 50 वर्ष होते.या सावत्र आईला मुलाने बेदल मारहाण करून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडलीय. या संदर्भातलं एक सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांच्या हाती लागले आहे. या फुटेजमध्ये आगीत जळणारी महिला मदतीसाठी भीक मागते आहे. तिला श्वास घेण्यास त्रास होतोय. मला श्वास घेता येत नाही आहे, माझे इनहेलर काम करत नाही,असे महिला म्हणताना दिसतेय.

हे ही वाचा : तीन हजार दिले नाही म्हणून ‘आयटी’तील तरुणाचा घेतला जीव

आरोपीने सुरुवातीला मला बेदम मारहाण केली. या मारहानीनंतर माझ्यावर पेट्रोल टाकून आग लावली. यावेळी स्वत:ला वाचवण्यासाठी मी दुसऱ्या मजल्यावरून खिडकीतून उडी घेतली. या घटनेची माहिती स्थानिकांना मिळताच त्यांनी त्वरीत मला रूग्णालयात दाखल केल्याची माहिती पिडीत महिलेने पोलिसांना दिली. या घटनेत महिलेच अर्धे शरीर जळालं आहे आणि ती कोमात गेली असल्याची माहिती आहे.

हे वाचलं का?

या प्रकरणावर शेजारी डेनिस विलियम्स म्हणाला की, मी सर्वप्रथम इमरजन्सी नंबरवर फोन करून या घटनेची माहिती दिली होती. या घटनेदरम्यान कुत्रे ओरडत होते. या कुत्र्यांनीच त्याला घटनास्थळी नेले. यावेळी पिडीत महिला मला आगीत ढकलल्याचे म्हणत होती, असे त्याने म्हटलेय.

हे ही वाचा : पत्नीला वाटलं नवऱ्याला दुसरीही बायको, पर्दाफाश करायला गेली अन्…

दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलगा (Boy) रॉबिन्सनला ताब्यात घेतले आहे. मात्र रॉबिन्सन हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. या प्रकरणी आता फेयरफिल्ड टाऊनशीपच्या पोलिसांनी रॉबिन्सनवर आग लावल्याप्रकरणी आणि बेदम मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्याला ताब्यात घेऊन जेलमध्ये टाकण्यात आले आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT