धक्कादायक! मुलीचं लग्न अवघ्या 10 दिवसावर, तरुणाने उचललं टोकाचं पाऊल
मुलीचं लग्न अवघ्या दहा दिवसावर आलं होतं म्हणून कुटुंबीयांसह मुलगीही लग्नाच्या खेरदीत मग्न होती. आज ती बाजारात गेली असतानाच भर बाजारात तिच्या वर एका तरुणाने ॲसिड हल्ला करण्यात आल्याने मुलगी जखमी झाली आहे.
ADVERTISEMENT
UP Crime : उत्तर प्रदेशातील महाराजगंजमध्ये (Uttar Pradesh Maharajganj) एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका 25 वर्षीय तरुणीवर ॲसिड (Acid Attack) फेकून तिला गंभीर जखमी (Girl Injured) करण्यात आले आहे. ज्या मुलीवर ॲसिड फेकण्यात आले आहे, त्या मुलीचे लग्नही ठरले होते. लग्नाच्या (Marriage) खरेदीसाठी ती आईसोबत बाजारात गेली होती. बाजारातून घरी येत असतानाच तिच्यावर अॅसिड हल्ला करण्यात आल्याने ती गंभीर जखमी झाली आहे.
ADVERTISEMENT
भर बाजारात हल्ला
या घटनसंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना भिटौली पोलिसांच्या हद्दीत घडली आहे. ॲसिड हल्ला करताना हल्लेखोरांनी काळ्या रंगाच्या स्कूटरुन आले होते. यावेळी त्यांनी मास्कही घातला होता, वर त्यावर पोलीस असं लिहिले होते असंही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. ज्या मुलीचे लग्न ठरले होते, त्या मुलीच्या मागे एक मुलगा लागला होता. मुलगी खरेदीसाठी बाजारात गेली होती, त्यावेळी हा हल्ला करण्यात आला आहे.
हे ही वाचा >> अन् बाळासाहेबांसाठी नारायण राणे बनले ‘सुरक्षारक्षक’! लोणावळ्यातील बंगल्यातला सांगितला भन्नाट किस्सा
ॲसिड फेकून पळ काढला
मुलीचे लग्न अवघ्या दहा दिवसावर आलेले असतानाच तिच्यावर ॲसिड हल्ला झाल्याने परिसरात जोरदार खळबळ उडाली आहे. लग्नाची घाई चालू असतानाच संधी साधून तरुणाने मुलीवर हल्ला केला. बाजारात फिरत असताना मुलीवर ॲसिड हल्ला करण्यात आला तेव्हा आजूबाजूला अनेक लोकं होती. मात्र त्याने ॲसिड फेकून पळ काढल्याने तो कोणालाच सापडला नाही.
हे वाचलं का?
प्रेमप्रकरणातून हल्ला
मुलीवर ॲसिड हल्ला झाल्यानंतर लोकांनी तिला रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी डॉक्टरांनी ती 5 ते 10 टक्के भाजली असल्याचे सांगितले आहे. या प्रकरणी पोलिसांकडून हल्ला करणाऱ्याचा शोध घेण्यात येत आहे. मुलीचे लग्न अवघ्या 10 दिवसावर आलेले असतानाच हा हल्ला झाल्याने प्रेमप्रकरणातून हा हल्ला करण्यात आला आहे का त्याचा शोध पोलीस घेत आहे.
हे ही वाचा >>Heart Attack : अचानक छातीत कळ आली अन् हृदयविकाराच्या झटक्याने 28 वर्षीय डॉक्टरचा मृत्यू
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT