पत्नीचे 68 वर्षांच्या वृद्धासोबत शारीरिक संबंध... संतापलेल्या पतीने फावड्याने कापूनच टाकलं, घडलं तरी काय?

मुंबई तक

Shocking Murder Case Viral :  उत्तरप्रदेशच्या हमीरपूर जिल्ह्यात 5 जुलै रोजी एका 68 वर्षीय वृद्धाची हत्या करण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणाचा कसून तपास करून आरोपीला अटक केली.

ADVERTISEMENT

Shocking Murder Case
Shocking Murder Case
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पतीने पत्नीच्या चारित्र्यावर घेतला संशय

point

शेतात बोलावून वृद्धावर केले फावड्याने वार

point

पोलिसांनी केली आरोपीला अटक

Shocking Murder Case Viral :  उत्तरप्रदेशच्या हमीरपूर जिल्ह्यात 5 जुलै रोजी एका 68 वर्षीय वृद्धाची हत्या करण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणाचा कसून तपास करून आरोपीला अटक केली. आरोपीला संशय होता की, त्याच्या पत्नीचं मृत वृद्धासोबत अनैतिक संबंध होते. याचकारणामुळे त्याने शेतात झोपलेल्या वृद्धाची फावड्याने हत्या केली. हत्येनंतर पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरु केला. जवळपास 8 दिवसानंतर पोलिसांनी या हत्या प्रकरणाचा छडा लावला.

ही धक्कादायक घटना मामला जिल्ह्यातील राठ येथील चिल्ली गावात घडली. जिथे 5 जुलैला विजय बहादूर राजपूतची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. हत्येच्या घटनेबाबत पोलिसांनी कसून तपास सुरु केला. पोलिसांना घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांच्या आधारावर चिल्ली गावातील वीरेंद्र राजपूतला अटक केली. त्यानंतर आरोपीने त्याचा गुन्हा कबूल केला. आरोपीने पोलिसांना सांगितलं की, त्याने फावड्याने हल्ला करून वृद्धाची हत्या केली.

हे ही वाचा >> मुंबईची खबर: मुंबईत मिळणार स्वस्तात घर! 'MHADA' मध्ये निघाली मोठी लॉटरी, बघा तुमचा नंबर लागतोय का..

आरोपी वीरेंद्र राजपूतला दारूचं व्यसन लागलं होतं. वृद्धही नेहमी त्याच्या घरी जाऊन दारू प्यायचा. त्याची पत्नी या वृद्धाला कधी कधी जेवणही द्यायची. दारु पिण्यावरून आरोपीचे पत्नीसोबत वादविवाद व्हायचे. आरोपीला संशय होता की, त्याच्या पत्नीचे वृद्धासोबत संबंध आहेत. या संशयामुळे आरोपीने वृद्धाची निर्घृण हत्या केली. आरोपीने त्याच्या डोक्यावर फावड्याने हल्ला केला. हत्या केल्यानंतर आरोपीने त्याच्या पत्नीला सांगितलं की, कोणीतरी मौना बाबाची हत्या केली आहे.

पोलिसांनी आरोपीला केली अटक

घटनास्थळी पोलिसांना काही महत्त्वाचे पुरावे मिळाले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी वीरेंद्र राजपूतला अटक केली. अपर एसपी मनोज गुप्ताने माहिती देत म्हटलं की, आरोपीने त्याचा गुन्हा कबूल केला आहे. पत्नीसोबत वृद्धाचे अनैतिक संबंध होते, या संशयावरून त्याचा खून केला, असं आरोपीने पोलिसांना सांगितलं. 

हे ही वाचा >> पिझ्झा अन् कोल्ड्रिंक्समध्ये टाकलं गुंगीचं औषध! IIM बॉईज हॉस्टेलमध्ये तरुणीवर बलात्कार.. नेमकं काय घडलं?

हे वाचलं का?

    follow whatsapp