Oyo हॉटेलमध्ये नातेवाईकासोबत अनैतिक संबध, काय घडलं हॉटेलमध्ये?

मुंबई तक

ADVERTISEMENT

immoral relationship with boyfriend married woman murder in oyo hotel
immoral relationship with boyfriend married woman murder in oyo hotel
social share
google news

Immoral Relationship and Murder: नोएडा: OYO मध्ये आपल्या प्रियकराला (Boyfriend) जाऊन भेटणं आपल्यासाठी शेवटचं ठरू शकतं याची तिळमात्र कल्पना नसलेल्या एका महिलेचा अत्यंत वेदनादायक असा मृत्यू झाल्याची घटना उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये (Noida) घडली आहे. महिला ज्या प्रियकराला भेटली तोच तिचा काळ ठरला. असा आरोप आहे की, ओयो हॉटेलमध्येच प्रियकराने महिलेची अत्यंत क्रूरपणे हत्या (Murder) घडवून आणली. (immoral relationship with a relative a horrible incident with a married woman oyo hotel crime news)

ADVERTISEMENT

जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

नोएडाच्या सेक्टर 63 पोलीस ठाण्यातून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे OYO हॉटेलमध्ये प्रियकराला भेटण्यासाठी आलेल्या प्रेयसीची प्रियकराने हत्या केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार महिलेचे लग्न झाले होते. आता महिलेच्या पतीच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तिच्या प्रियकराला अटक केली आहे.

प्रियकराचे होणार होते लग्न

मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला उत्तर प्रदेशातील इटावा येथील रहिवासी होती. ती नोएडामध्ये पती आणि 2 मुलांसह राहत होती. या महिलेचे सोनू नावाच्या तरुणासोबत अनैतिक संबंध होते, जो महिलेचा दूरचा नातेवाईक आहे.

हे वाचलं का?

अधिक वाचा- तृतीयपंथी प्रियावरील प्रेम ठरलं जीवघेणं; हिंगोलीत तरुणाच्या हत्येनं खळबळ

माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, गेल्या शुक्रवारी ही महिला आपल्या प्रियकराला सेक्टर-63 छिजारसी येथील एका OYO हॉटेलमध्ये भेटण्यासाठी गेली होती. याचवेळी महिलेला समजले की, प्रियकर सोनूचे आता लग्न होणा आहे. याच मुद्द्यावरून महिला आणि प्रियकर सोनूमध्ये वाद सुरू झाला.

नेमकी घटना कशी घडली?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला आणि तरुणांमधील वाद इतका वाढला की आरोपी सोनूने महिलेशी भांडण सुरू केले. यावेळी प्रचंड चिडलेल्या सोनूने महिलेच्या डोक्यावर एका जड वस्तूने प्रहार केला. ज्यामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला असल्याचं पोलीस चौकशीत समोरं आलं आहे.\

ADVERTISEMENT

अधिक वाचा- गोव्यात डच तरुणीसोबत घडला भयंकर प्रसंग; रिसॉर्टमधील कर्मचारीच निघाला वासनांध

दरम्यान, महिलेच्या पतीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सोनू नावाच्या तरुणाला अटक केली आहे. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

ADVERTISEMENT

अनैतिक संबंधांचा संशय…आईसह 9 महिन्याच्या चिमुकलीला जिवंत जाळलं

उत्तर प्रदेशातील शाहपूरच्या हरैया परिसरात पलंगावर झोपलेल्या एका आई (mother) आणि 9 महिन्यांच्या चिमुकलीला (girl child) जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत चिमुकलीचा मृत्यू झाला असून आई हॉस्पिटलमध्ये (Hospital) जीवन-मरणाची लढाई लढतेय.

अधिक वाचा- घरात नवरा-बायकोसारखे राहायचे चुलत भाऊ-बहीण, सत्य समोर येताच घडलं फारच…

शिवनाथ यांची 30 वर्षीय पत्नी आणि 9 महिन्याची मुलगी घराबाहेर पलंगावर झोपली होती. यावेळेस त्यांच्यावर डिझेल टाकून जाळून मारण्याचा प्रयत्न झाला. पलंगाला आग लागताच आईने आरडाओरड करण्यास सुरुवात केली, त्यानंतर घटना उघडकीस आली. महिलेचा आवाज ऐकूण अनेकजण घटनास्थळी हजर झाले होते. महिला आणि 9 महिन्याची मुलगी आणि चिमुकलीला आगीच्या भक्ष्यस्थानी पाहून स्थानिकांनी लगेचच आग विझून माय-लेकीला रूग्णालयात दाखल केले. या घटनेत 9 महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला तर आईची प्रकृती चिंताजनक आहे.

महिलेचा पती शिवनाथ हा पंजाबमध्ये राहून मजदूरी करतो. काही दिवसांपुर्वीच तो घरी आला होता. शिवनाथ यांची 30 वर्षीय पत्नी आणि 9 महिन्याची मुलगी हिला तिच्याच कुटूंबियांकडून मारहाणीचा प्रयत्न झाला आहे. घराबाहेर आई आणि लेक झोपली असताना दीर आणि काका यांनी डिझेल टाकून जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT