नागपूरात MBBS च्या विद्यार्थ्याने रेल्वेसमोर मारली उडी मारत उचललं टोकाचं पाऊल! कारण…
नागपुरात एमबीबीएसच्या विद्यार्थ्याने भरधाव वेगाने येणाऱ्या रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली. 24 वर्षीय पवन काकडे हा एमबीबीएसच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी होता.
ADVERTISEMENT
Suicide Case : नागपुरात एमबीबीएसच्या विद्यार्थ्याने भरधाव वेगाने येणाऱ्या रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली. 24 वर्षीय पवन काकडे हा एमबीबीएसच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी होता. तो वाशिम जिल्ह्यातील रहिवासी असून नागपूरच्या बुटीबोरी येथील महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेत होता. (In Nagpur an MBBS student did Suicide by jumping in front of a train Know the reason)
ADVERTISEMENT
परीक्षेच्या तणावातून तरूणाने उचललं टोकाचं पाऊल!
मिळालेल्या माहितीनुसार, परीक्षेत पवनला पेपर चांगले गेले नाहीत. यामुळे बऱ्याच दिवसांपासून तो नैराश्यात होता. रविवारी (10 डिसेंबर) फिरायला जाण्याच्या बहाण्याने तो हॉस्टेलमधून बाहेर पडला आणि यानंतर त्याने टोकाचं पाऊल उचललं. तो रेल्वे रुळाजवळ पोहोचला. येथे त्याने भरधाव वेगात आलेल्या रेल्वेसमोर उडी मारली. यामुळे पवनचा जागीच मृत्यू झाला.
वाचा : Uddhav Thackeray : ‘मुख्यमंत्र्यांनी स्वच्छतेची सुरुवात सहकाऱ्यांपासून करावी’, ठाकरेंचा सणसणीत टोला
या घटनेबाबत आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांना समजले की, विद्यार्थी जवळ्याच हॉस्टेलमध्ये राहत होता. त्याच्या मृत्यूची माहिती तातडीने पालकांना देण्यात आली. पवनच्या मृत्यूमुळे संपूर्ण कॉलेज आणि हॉस्टेलमध्ये शोककळा पसरली आहे.
हे वाचलं का?
यापूर्वी नागपूर जिल्ह्यातच एका इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने परीक्षेत नापास झाल्याने आत्महत्या केली होती. नागपूर शहरातील पाचपौली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली होती. परीक्षेत काही विषयांत कमी गुण मिळाल्याने या 25 वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. कुटुंबीय काही कामानिमित्त बाहेर गेले असताना विद्यार्थ्याने खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. घरातील सदस्य घरी येताच मुलाचा मृतदेह पाहून आरडाओरडा करू लागले.
वाचा : ‘रोहित शर्मा ‘जाडा’ आहे, पण तो…’, टीम इंडियाच्या कोचचं मोठं विधान
पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. वडिलांनी सांगितले की, त्यांचा मुलगा परीक्षेनंतर तणावाखाली होता. त्यालाही खूप समजावलं. मात्र अखेर त्याने हे शेवटचं टोकाचं पाऊल उचललं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT