Kalyan: मुलीच्या मित्रांना बोलवायची घरी, पतीने विरोध करताच दिले पेटवून

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Kalyan Crime News A Women Calling her Daughter's friends at home When husband Objected She tried to burn him
Kalyan Crime News A Women Calling her Daughter's friends at home When husband Objected She tried to burn him
social share
google news

Crime News : कल्याण (Kalyan Crime) शहरात एका महिलेने पेन्शनच्या पैशासाठी आपल्या 61 वर्षीय पतीला पेटवून मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून चौकशी केली. पोलिसांनी सांगितले की, पीडित व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या तरी कोणालाही अटक झालेली नाही. (Kalyan Crime News A Women Calling her Daughter’s friends at home When husband Objected She tried to burn him)

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण कल्याण शहरातील आहे. येथे एका ६१ वर्षीय व्यक्तीचा पत्नीसोबत पेन्शनच्या पैशांवरून वाद सुरू होता. पोलिसांचे म्हणणे आहे की, महिलेच्या मुलीचे दोन मित्र अनेकदा त्यांच्या घरी येत असत. यावर महिलेच्या पतीने आक्षेप घेत दोन्ही तरुणांना त्यांच्या घरी येऊ देण्यास नकार दिला.

वाचा : Solapur : स्वतःच्या श्रद्धांजलीच स्टेटस ठेवलं अन् झाडल्या तीन गोळ्या, कारण…

यामुळे महिला अधिकच अस्वस्थ झाली. यानंतर महिलेने मुलीच्या दोन मित्रांसोबत मिळून एक भयानक कट रचला. पेन्शनसाठी तिने पतीची हत्या करण्याचा कट रचला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पतीला जिवंत जाळण्याचा रचला कट

पोलिसांनी सांगितले की, महिलेने 8 डिसेंबरच्या रात्री तिच्या मुलीच्या दोन्ही मित्रांना फोन केला. यानंतर दोघांनी महिलेच्या पतीवर ज्वलनशील पदार्थ ओतला आणि महिलेने पेटवून दिलं. यानंतर पीडित व्यक्तीने आरडाओरडा सुरू केल्याने शेजाऱ्यांनी येऊन पाहिले. त्यांनी तातडीने आग विझवली आणि पीडित व्यक्तीला तातडीने रुग्णालयात नेले आणि पोलिसांनाही घटनेची माहिती दिली.

वाचा : Crime : आईचं शिर धडापासून केलं वेगळं, मुंडकं घेऊन मुलगा फिरला गावभर, कारण…

आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही

माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले आणि चौकशी केली. पोलिसांनी महिलेच्या 61 वर्षीय पतीला इतर दोन लोकांच्या मदतीने पेटवून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील अन्य दोन आरोपी पीडित व्यक्तीच्या मुलीचे मित्र आहेत. पण अजून कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

ADVERTISEMENT

वाचा : Gopichand Padalkar : इंदापुरात आमदार पडळकरांवर भिरकावल्या चप्पला; भुजबळ भडकले

रुग्णालयात दाखल झालेल्या पीडित व्यक्तीने पोलिसांना काय सांगितले?

पोलिसांनी रुग्णालयात दाखल झालेल्या पीडित व्यक्तीचा जबाब नोंदवला, ज्यामध्ये त्याने सांगितले की, पत्नी त्याच्या पेन्शनवरून वाद घालत असे आणि दोन तरुण वारंवार घरीही यायचे. या दोन्ही तरुणांपासून आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार पीडित व्यक्तीने यावेळी पोलिसांना केली. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यात व्यस्त आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT