धक्कादायक! भाजपच्या महिला नेत्याने घरात घेतला गळफास

मुंबई तक

ADVERTISEMENT

madhya pradesh bjp leader pooja dadu suicide by hanging herself. She was the daughter of former MLA Rajendra Dadu.
madhya pradesh bjp leader pooja dadu suicide by hanging herself. She was the daughter of former MLA Rajendra Dadu.
social share
google news

Pooja Dadu Suicide : मध्य प्रदेशातील बुरहानपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. खकनारच्या भाजप नेत्या आणि जिल्हाध्यक्ष पूजा दादू यांनी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. पूजा दादू यांन आत्महत्या केल्याचे दिसताच त्यांच्या कुटुंबीयांनी आरडाओरड करत त्यांना मानसिक धक्का बसला आहे. त्यानंतर पूजा यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पूजा दादू या माजी आमदार राजेंद्र दादू (former MLA Rajendra Dadu) यांच्या कन्या होत्या. (madhya pradesh bjp leader pooja dadu suicide by hanging herself)

ADVERTISEMENT

घरीच घेतला गळफास

खकनारच्या जिल्हाध्यक्ष पूजा दादू यांनी शनिवारी रात्री उशिरा कान्हापूर येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी पूजाला ताबडतोब बुरहानपूरच्या संजय नगर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे सांगण्यात आले. पूजा दादू यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. या घटनेची माहिती पोलीस घेत असून अजून त्याचे कारण स्पष्ट झाले नाही.

हे ही वाचा >>‘नितेश राणेंनी कार्टून बघावं’ ठाकरेंच्या नेत्याने उडवली खिल्ली

भाजपचे नुकसान

भाजप जिल्हाध्यक्ष मनोज लाधवे यांनी सांगितले की, शनिवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास खकनार जिल्हाध्यक्षांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मात्र त्याचे अद्याप कारण स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या निधनामुळे पक्षाचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण काय याचा पोलीस तपास सरत आहेत. त्यांचे निधन झाल्याचे समजताच भाजपच्या अनेक नेत्यांनी त्यांच्या घरी धाव घेतली.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Sai Baba Temple : शिर्डीत साई भक्तांची फसवणूक! बनावट देणगी पावती प्रकरण काय?

माजी आमदार दादूंची कन्या

पूजा दादू या खकनार जिल्ह्याच्या अध्यक्षा होत्या. सध्या त्यांची मोठी बहीण मंजू दादू या मंडी मंडळाच्या उपाध्यक्षा आहेत. तर त्याही आमदार राहिल्या आहेत. त्यांचे वडील दिवंगत राजेंद्र दादू नेपानगरमधून आमदार झाले होते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT