अनैतिक संबंधात आड येत होता पोटचा मुलगा, प्रोफेसरच्या प्रेमात वेडी झालेल्या महिलेने शेवटी...
बिहामधील अररिया जिल्ह्यातून एका प्रोफेसरच्या प्रेमात वेडी झालेल्या एका महिलेने आपल्याच पोटच्या मुलाची हत्या केल्याचं समोर आलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

बिहारमधून खळबळजनक बातमी

अनैतिक संबंधांमुळे पोटच्या मुलाची केली हत्या
Bihar News: बिहामधील अररिया जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना घडल्याचं समोर आलं आहे. एका प्रोफेसरच्या प्रेमात वेडी झालेल्या एका महिलेने आपल्याच पोटच्या मुलाची हत्या केल्याचं समोर आलं आहे. त्या महिलेचे एका प्रोफेसरसोबत अवैध संबंध होते आणि त्यांच्या नात्यात महिलेचा मुलगा अडचण आणत असल्यामुळे तिने प्रोफेसरसोबत मिळून आपल्याच मुलाची हत्या केली. हत्येनंतर त्याच्यावर ज्वलनशील पदार्थ टाकून त्याला जाळण्याचा सुद्धा प्रयत्न करण्यात आला. हत्येनंतर त्याचा मृतदेह पटणा जिल्ह्यातील रस्त्याच्या कडेला फेकण्यात आला. पोलिसांनी गुरुवारी या घटनेचा खुलासा करत मुलाची हत्या केल्याप्रकरणी त्याच्या आईला अटक केली आहे.
या घटनेतील आरोपी महिलेचं नाव रोमा कुमारी असून ती अररिया जिल्ह्यातील रानीगंज गावाची रहिवाशी होती. रोहतासमधील एका ट्रेनिंग कॉलेजमधील निर्मल पासवान नावाच्या प्रोफेसरसोबत तिचे प्रेमसंबंध होते. रोमाचा मुलाचा आईच्या अनैतिध नातेसंबंधांना विरोध होता.
मृतदेह जाळण्याचा प्रयत्न
मिळालेल्या माहितीनुसार, 15 जून रोजी पटणा शहरातील बाढ पोलिसांना बेढना फोरलेन ओव्हरब्रिजवळ रस्त्याच्या कडेला अर्धा जळलेला मृतदेह सापडला. त्यानंतर बाढ पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, त्या मुलाची हत्या करून त्याच्या मृतदेह दुसऱ्या शहरात आणण्यात आला. तसेच पुरावा मिटवण्याच्या प्रयत्नात मृतदेह जाळण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला.
अनैतिक संबंधांच्या आड येत होता मुलगा
पटणा ग्रामीण एसपी विक्रम सिहाग यांनी सांगितल्याप्रमाणे निर्मल पासवान आणि रोमा कुमारी यांच्यात अवैध संबंध होते. रोमा आणि तिच्या पतीमध्ये सुद्धा सतत वाद व्हायचे आणि रोमाच्या मुलाला हीच गोष्ट अजिबात पटत नव्हती. तिच्या मुलाचा या सगळ्याला विरोध असल्यामुळे रोमा आणि प्रोफेसर प्रियकराला नेहमी खटकत होतं. याच कारणामुळे त्या मुलाची हत्या करण्यात आली.
हे ही वाचा: पैशांचा माज, बड्या बापाच्या लेकीनं मर्सडिझनं दुचाकीला दिली धडक, पती-पत्नी दोघेही हवेत फेकले...
पोलिसांनी दिली माहिती
एसपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या मुलाच्या आईला म्हणजेच रोमा कुमारीला अटक करण्यात आली. ज्या गाडीतून मुलाचा मृतदेह आणण्यात आला, ती गाडीसुद्धा जप्त करण्यात आली आहे. मुलाचे हात-पाय बांधून त्याला बाढमध्ये आणण्यात आले होते, ती दोरीसुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. यासोबतच आरोपी जवळील तीन मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.
सीसीटीव्ही फूटेजमधून कारचा सुगावा
बाढमध्ये हायवेवरील सीसीटीव्ही फूटेज पोलिसांकडून तपासण्यात आले. त्यानंतर पोलिसांना टाटा टागोर कारचा सुगावा लागला. मृतदेह बाढमध्ये फेकण्याआधी तो बेगूसराय, वैशाली, समस्तीपुर अशा ठिकाणी फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, उजेड होत असल्यामुळे त्यांनी तो मृतदेह फोरलेनमध्ये रस्त्याच्या कडेला फेकला.
हे ही वाचा: लस्सीत गुंगीच्या गोळ्या मिसळून पत्नी बॉयफ्रेंडसोबत छू....बाई काय हा प्रकार?
एसपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने पोलिसांपासून वाचण्यासाठी नेपाळमध्ये जाऊन आपला मुलगा हरवल्याची तक्रार देखील दाखल केली आहे. महिलेचा प्रियकर निर्मल पासवानला ताब्यात घेण्यासाठी पोलीस छापेमारी करत असल्याची माहिती मिळाली आहे.