मुलाची होणारी पत्नी प्रचंड सुंदर, सासऱ्याची नियत ढळली.. नको ते केलं अन् घरात बायको म्हणूनच...
Viral News: आपल्या होणाऱ्या सुनेसोबत पळून जात सासऱ्याने लग्न केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील रामपूरमध्ये घडली आहे. सध्या या प्रकरणाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.
ADVERTISEMENT

रामपूर: उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातून नातेसंबंधांना लाज आणणारी एक घटना समोर आली आहे. येथे, होणऱ्या सुनेला तिच्या सासऱ्यानेच पळून नेल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. हे सगळं प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही तर होणाऱ्या सुनेसोबत सासऱ्यानेच लग्न केलं आणि तिला आपली पत्नी बनवली.
दरम्यान, या संपूर्ण घटनेमुळे जा तरुणाचं लग्न होणार होतं त्याला आणि त्याच्या आईला मात्र खूप धक्का बसला आहे. कारण मुलाच्या वडिलांनीच अशा प्रकारचं कृत्य केलं आहे. त्यामुळे आता न्यायासाठी कोणाकडे दाद मागावी हेच त्यांना समजत नाही.
अल्पवयीन मुलाचं लग्न ठरवलं, पण सुनेसोबत सासराच गेला पळून.. नेमकं प्रकरण काय?
खरं तर सून ही मुलीसारखी असते, परंतु बरेच लोक नातेसंबंधांच्या मर्यादा ओलांडतात आणि नातेसंबंधांना काळीमा फासतात. रामपूरच्या बासनगली गावातही अशीच एक घटना घडली आहे. जिथे शकील नावाच्या एका व्यक्तीने आपल्या मुलाचे झबीना नावाच्या मुलीशी लग्न ठरवलं होतं.

हे ही वाचा>> 16 वर्षांच्या मेव्हणीवर जडला दाजींचा जीव, गरोदरही राहिली अन् घडली थरकाप उडवणारी घटना
मिळालेल्या माहितीनुसार, ज्या मुलाचं लग्न ठरविण्यात आलं होतं तो अल्पवयीन असल्याचं समजतं आहे. त्यामुळेच एवढ्या लवकर मुलाचं लग्न करू नये असं कुटुंबातील सदस्यांचं मत होतं. परंतु असा आरोप आहे की, शकीलने त्याची पत्नी शबाना आणि मुलांना मारहाण केली आणि त्यांच्यावर दबाव आणला आणि त्या मुलीशी लग्नासाठी तयार केलं.










