लग्न करायचं म्हणून गोव्याला गेले, वादानंतर प्रेयसीचा खून करुन जंगलात फेकलं, एका तिकीटामुळे बिंग कसं फुटलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय आणि रोशनी रविवारी बसने गोव्यात आले. प्रवासादरम्यान त्यांच्यात वाद झाला आणि ते पिलीम-धरबंदोरा इथं उतरले. संजयने रोशनीला जवळच्या जंगलात नेलं आणि तिचा गळा कापून हत्या केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

गोव्यात जंगलात सापडला होता तरूणीचा मृतदेह

लग्नासाठी प्रियकरासोबत आली होती गोव्यात

किरकोळ वादानंतर खून झाल्याची माहिती

पोलिसांनी कसा केला घटनेचा तपास
Crime News : देशभरात गेल्या काही दिवसांपासून काही प्रकरणं चर्चेत आहेत. राजा आणि सोनम प्रकरणानंतर आता आणखी एक घटना समोर आली आहे. दक्षिण गोव्यातील प्रताप नगर येथील जंगलात एका 22 वर्षीय तरुणीचा मृतदेह सापडला होता. त्यानंतर पोलिसांनी तिचा प्रियकर संजय केविन एम. याला हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे. संजय आणि मृत तरुणी, रोशनी मोझेस एम. हे दोघेही कर्नाटकचे रहिवासी होते. हे जोडपं लग्नाच्या उद्देशाने बेंगळुरूहून गोव्यात आलं होतं, पण त्यांच्यातील वादामुळे ही घटना घडली.
हे ही वाचा >> भरदिवसा नग्न झाले आणि स्मशानभूमीत केला अघोरी प्रकार, कोल्हापुरातील विचित्र घटना काय? CCTV समोर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय आणि रोशनी रविवारी बसने गोव्यात आले. प्रवासादरम्यान त्यांच्यात वाद झाला आणि ते पिलीम-धरबंदोरा इथं उतरले. संजयने रोशनीला जवळच्या जंगलात नेलं आणि तिचा गळा कापून हत्या केली. हत्या करून तो पळून गेला, पण हुबळी, कर्नाटकमधून स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याला अटक करण्यात आली.
हे ही वाचा >> लाखाचे कोटी करुन देतो म्हणत फसवणूक, पोलिसांनी आरोपीच्या घरावर छापा टाकल्यावर सापडली, कवटी, दोरे...
सोमवारी सकाळी प्रताप नगरच्या जंगलात एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला. तिचा गळा कापलेला होता. पोलिसांनी घटनास्थळी सापडलेल्या वस्तूंची तपासणी केली असता, रोशनीच्या पर्समधील बस तिकीटावरून ती हुबळीतून प्रवास करत होती, अशी माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी लुकआउट नोटीस जारी केली आणि रोशनीची ओळख पटवली. तपासात असं समजलं की, रोशनी आणि संजय गेल्या पाच वर्षांपासून नात्यात होते.
दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक टीकम सिंग वर्मा यांनी सांगितले की, हत्येचे कारण प्रेमसंबंधातील वाद आहे. सोमवारी रात्रीपर्यंत, म्हणजेच मृतदेह सापडल्यानंतर 24 तासांच्या आत संजयला हुबळीतून अटक करण्यात आली. सध्या पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.