होणाऱ्या जावयाशी केली कट्टर दुश्मनी! लग्नाच्या भीतीपोटी अख्ख्या कुटुंबानं घरच्या पोरीला संपवलं, नंतर घडलं..

मुंबई तक

Murder Case Viral News : उत्तर प्रदेशच्या बागपतमध्ये ऑनर किलिंगचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. 21 वर्षांच्या तरुणीला तिच्याच कुटुंबियांनी मारलं आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

रात्री जाळला मृतदेह, राख यमुना नदीत फेकली

point

प्रियकर अंकितने केला खुलासा

point

पोलिसांकडून आरोपी डॉक्टरचा शोध सुरु

Murder Case Viral News : उत्तर प्रदेशच्या बागपतमध्ये ऑनर किलिंगचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. 21 वर्षांच्या तरुणीला तिच्याच कुटुंबियांनी मारलं आहे. शिवानी असं त्या मृत तरुणीचं नाव आहे. ज्या तरुणाशी ती प्रेम करत होती, तो दुसऱ्या जातीचा होता. यामुळे शिवानीने तिच्या कुटुंबियांसोबत अनेकदा वादविवाद केले होते. गावात समाजात कुटुंबाची बदनामी होऊ नये, यासाठी त्यांनी शिवानीची हत्या केली.

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण बडौत कोतवाली भागातील लुहारी गावातील आहे. आरोपी संजीव उर्फ संजूने पोलिसांना सांगितलं की, शिवानीने मंगळवारच्या रात्री कुटुंबाला स्पष्ट सांगितलं की, ती कोर्ट मॅरेज करणार आहे. त्यानंतर कुटुंबातील लोकांना प्रचंड राग आला आणि त्यांनी शिवानीला मारहाण केली. तिचे वडील, आई आणि भाऊ रवी, आत्याच्या मुलीनं मिळून शिवानीचा गळा दाबून हत्या केली. या हत्येनंतर कुटुंबियांनी तिचा मृतदेह रात्रीतून जाळून टाकला. अस्थी यमुना नदीत फेकल्या, जेणेकरून कोणाला पुरावा सापडणार नाही.

हे ही वाचा >> वहिनी झाली दिरावर फिदा, प्रेमाने बोलावलं बेडरूममध्ये.. म्हणाली, 'ऐक ना माझ्या नवऱ्याला ना...'

रात्री जाळला मृतदेह, राख यमुना नदीत फेकली

हत्येनंतर आरोपींनी शिवानीचा मृतदेह घराच्या बाहेर दूर ठिकाणी जाळला. त्यानंतर सर्व अवशेष युमना नदीत फेकले. हत्येत सामील असलेला भाऊ रवी आणि आत्याची मुलगी घटना घडल्यापासून फरार आहे. तर वडील संजीव आणि आई बबीताला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांचं म्हणणं आहे की, हत्येचा कट रचून शिवानीला मारण्यात आलं.

प्रियकर अंकितने केला खुलासा

बुधवारी सकाळी शिवानीचा प्रियकर अंकितने शिवानी गायब झाल्याची माहिती दिली. हत्येचा संशय आल्यानंतर त्याने पोलिसांना कळवलं. पोलिसांनी तातडीनं याप्रकरणी तपास सुरु केला. जेव्हा शिवानीच्या कुटुंबियांकडे तपास करण्यात आला, तेव्हा त्यांनी गुन्हा कबूल केला. पोलिसांनी अंकितच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला आहे आणि फरार आरोपींचा शोध सुरु आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp