दिराचा वहिनीसोबत झाला वाद! पण, पुतण्या अन् पुतणीवर राग निघाला अन्... रागाच्या भरात दिराचं भयंकर कृत्य

मुंबई तक

एका तरुणाचा तिच्या वहिनीसोबत मोठा वाद झाला आणि याचाच राग त्या तरुणाने त्याच्या पुतण्या आणि पुतणीवर काढला. त्याने धारदार शस्त्राने पुतणीचा गळा चिरला आणि पीडित पुतण्याला दुसऱ्या मजल्यावरून फेकून दिलं.

ADVERTISEMENT

पुतण्या अन् पुतणीवर राग निघाला अन्...
पुतण्या अन् पुतणीवर राग निघाला अन्...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

दिराचा वहिनीसोबत झाला वाद!

point

पण, पुतण्या अन् पुतणीवर राग निघाला अन्...

point

रागाच्या भरात दिराचं भयंकर कृत्य

Crime News: उत्तर प्रदेशातील बिजनौर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका तरुणाचा तिच्या वहिनीसोबत मोठा वाद झाला आणि याचाच राग त्या तरुणाने त्याच्या पुतण्या आणि पुतणीवर काढला. त्याने धारदार शस्त्राने पुतणीचा गळा चिरला आणि पीडित पुतण्याला दुसऱ्या मजल्यावरून फेकून दिलं. या हल्ल्यात मुलीचा जागीच मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. तसेच, पुतण्या गंभीररित्या जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर आरोपी फरार झाला होता मात्र, पोलिसांनी त्याला अटक केल्याची माहिती समोर आली आहे.

दारू पिऊन वहिनीला शिवीगाळ केली अन्...  

मंडावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या राजपूर नवादा गावात ही धक्कादायक घटना घडली. गावातील रहिवासी असलेला जयपाल सिंह हा सार्वजनिक बांधकाम विभागात कर्मचारी असून त्याची दोन मुले अरुण आणि हिमांशू त्याच्यासोबत राहतात. हिमांशूला दारूचं व्यसन असून तो दारू पिऊन सतत घरातील सदस्यांसोबत वाद घालत असतो. घटनेच्या दिवशी, हिमांशू दारू पिऊन घरी परतला आणि नेहमीप्रमाणे त्याने त्याचा भाऊ अरुण आणि वहिनी मंजू यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. मंजूने त्याच्या अशा वागण्याला विरोध केला.

पुतण्या आणि पुतणीवर काढला राग!  

यामुळे, हिमांशू त्याच्या वहिनीवर इतका संतापला की तो थेट घराच्या दुसऱ्या मजल्यावर गेला आणि तिथे त्याने खेळत असलेल्या त्याची तीन वर्षांची पुतणी मानवीचा धारदार शस्त्राने गळा कापला. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, त्यानंतर त्याने आपला पाच वर्षीय पुतण्या मयंकला दुमजली इमारतीवरून खाली फेकून दिलं.

हे ही वाचा: मुंबई: मालकिणीच्या घरातूनच 3 कोटींचे दागिने केले लंपास... मुंबईतील मोलकरणीचा चकित करणारा कारनामा!

आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल  

यानंतर, गंभीररित्या जखमी झालेल्या मयंकला त्याची आई मंजू आणि वडील अरुण यांनी तातडीने रुग्णालयात नेलं. त्याची गंभीर प्रकृती पाहून डॉक्टरांनी त्याला दुसऱ्या रुग्णालयात रेफर रेलं. निर्घृण हल्ल्यानंतर आरोपीच्या पुतणीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर, आरोपी हिमांशू घरातून फरार गेला. त्यानंतर कुटुंबियांनी त्याच्याविरुद्ध मंडावली पोलीस स्टेशनमध्ये हत्या आणि हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आता त्याचा शोध सुरू केला असल्याचं सांगण्यात येत आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp