दुर्मिळ शक्तीवर्धक गोळ्या देतो म्हणून 48 लाख उकळले, '420' गुरुजीची पोलखोल, दोघांना अटक
Crime News : या प्रकरणात पोलिसांनी विजय प्रधान चितोदिया आणि मनोज सिंह चितोदिया या दोघांना अटक केली आहे. दोघेही महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
दुर्मिळ शक्तीवर्धक गोळ्या देतो म्हणून 48 लाख उकळले
अशी झाली '420' गुरुजीची पोलखोल, दोघांना अटक
Crime News : बेंगळुरू शहरात आयुर्वेदिक उपचाराच्या नावाने तब्बल 48 लाखांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रस्त्याच्या कडेला तंबू उभारून गंभीर आजारांचे उपचार करतो, असा दावा करणारे भामटे लोकांना लुबाडणारे असल्याचे माहिती समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी विजय प्रधान चितोदिया आणि मनोज सिंह चितोदिया या दोघांना अटक केली आहे. दोघेही महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील आहेत.
पोलिसांनी दोघांच्या ताब्यातून 17 प्रकारच्या बनावट आयुर्वेदिक औषधे, तब्बल 19.50 लाख रुपये रोख रक्कम आणि एक टेम्पो ट्रॅव्हलर जप्त केला आहे. या औषधांची किंमतच जवळपास 23.50 लाख रुपये असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. तपासात समोर आले की, हे टोळकं कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा अशा अनेक राज्यांत फिरत फिरत अशाच प्रकारे "ट्रॅव्हलिंग क्लिनिक" उभारून लोकांना लुटत होते.
तक्रारीनंतर भांडाफोड
22 नोव्हेंबर रोजी व्हाइट फील्डमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने ज्ञानभारती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. विवाहानंतर त्याला गुप्तांगाच्या क्षमतेसंबंधी त्रास जाणवत होता. उपचाराच्या शोधात तो एका कॉलेजजवळ लावलेल्या आयुर्वेदिक उपचाराच्या टेंटमध्ये गेला. टेंटमध्ये असलेल्या व्यक्तीने त्याला "गुरुजी" यांच्या प्रीमियम औषधांचा हवाला देऊन विश्वासात घेतले.
हेही वाचा : बलात्कार झाल्यानंतर मुलीने भितीपोटी शिक्षण थांबवलं, बीडमधील धक्कादायक प्रकार; नेमकं काय घडलं?










