'इथं सिगारेट पिऊ नका' तरुणाने पर्यटकांना सांगितलं अन् आरोपींनी दगडाने ठेचत...पानशेत हादरलं
Pune Crime news : A young man was brutally beaten up by a group of villagers who had come to visit the Panshet Dam for refusing to smoke cigarettes. The young man died from the brutal beating.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पुणे हे गुन्हेगारीचं हॉट्सस्पॉट

पानशेत धरणावर एका निष्पाप तरुणाची हत्या
Pune Crime News : पुणे हे गुन्हेगारीचं हॉट्सस्पॉट बनलं असल्याचं दररोज नव्याने सिद्ध होत आहे. पुण्यातील पानशेत धरणावर एका निष्पाप तरुणाची हत्या करण्यात आली आहे. हत्येचं कारण ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. तरुणाने पानशेत धरणावर फिरायला आलेल्या टवाळक्यांना सिगारेट पिण्यास मनाई केल्याने तरुणाला बेदम मारहाण केली. बेदम मारहाणीत तरुण मृत पावला आहे. ही घटना 15 जून रोजी घडली आहे.
हेही वाचा : धनशक्ती राजयोगाने 'या' राशी होणार मालामाल, तुमच्याही राशीचा असेल समावेश
संबंधित प्रकरणात आता तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत झालेल्या तरुणाचे नाव हे रोहिदास काटकर (वय 24) असे आहे. तो वेल्हे येथील रहिवाशी असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात आकाश सुभाष भिसे ( वय 21), भागवत मुंजाजी (वय 20), रितेश उत्तम जोगदंड (वय 21) उमेश उर्फ भैया रामभाऊ शेळके (वय 21) आणि पांडुरंग भानुदास सोनावणे (वय 19) यांना अटक करण्यात आली आहे. हे सर्व आरोपी मूळचे परभणी जिल्ह्यातील असून सध्या पुण्यातील नर्हे परिसरातील रहिवाशी आहेत.
नेमकं काय झालं?
ग्रामीण पोलीस अधिक्षक संदील गिल यांनी या संबंधित घटनेची माहिती दिली आहे. ते म्हणाले की, आरोपी 15 जून पानशेत धरणावर आले होते. त्यानंतर ते संध्याकाळी सात वाजता पुण्याच्या दिशेने रवाना झाले. ते एका हॉटेलसमोर सिगारेट ओढण्यासाठी थांबले असता, रोहिदास काटकर नावाच्या तरुणाने त्यांना सिगारेट न ओढण्यास सांगितले. यामुळे त्या दोघांच्यात वाद निर्माण झाला. हा वाद टोकाला गेला आणि त्यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. यावेळी आरोपींनी रोहिदासच्या छातीवर दगड मारला, अशावेळी रोहिदासचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली. अशावेळी आरोपी हा मोटारसायकलवरून पळून गेला.
हेही वाचा : डेटिंग अॅपवर झाली मैत्री अन् जडलं प्रेम, पण गरोदर राहिल्यानंतर छळ अन्...
पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला असता, आरोपींच्या गाड्या या पुण्यातील नर्हे येथील वाल्हेकर चौकात सापडल्या. पोलिसांनी अधिकची माहिती गोळा केली असता, दुचाकी मालकाने आकाश भिसेला गाडी दिली. त्यानंतर पोलिसांनी आकाश भिसेला आपल्या ताब्यात घेतलं. चौकशीवेळी त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यावेळी त्याने आपल्या साथीदारांची नावे सांगितली. पोलिसांनी संबंधित प्रकरणात आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.