डेटिंग अॅपवर झाली मैत्री अन् जडलं प्रेम, पण गरोदर राहिल्यानंतर छळ अन्...

मुंबई तक

मुंबईमध्ये अंधेरी शहरात एका तरुणाने डेटिंग अॅपच्या माध्यमातून महिला डॉक्टरचा शारीरिक छळ आणि जबरदस्तीने गर्भपात इतकेच नव्हे तर खाजगी फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे आरोप केले आहेत.

ADVERTISEMENT

डेटिंग अॅपवर झाली मैत्री अन् जडलं प्रेम, पण गरोदर राहिल्यानंतर छळ
डेटिंग अॅपवर झाली मैत्री अन् जडलं प्रेम, पण गरोदर राहिल्यानंतर छळ
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईतील महिला डॉक्टरसोबत घटला धक्कादायक प्रकार

point

ऑनलाइन डेटिंग अॅपवरुन झाली मैत्री पण...

point

तरुणावर महिलेचा लैंगिक छळ आणि धोका दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Mumbai News: मुंबईतील अंधेरी शहरातून एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. या परिसरात कार्यरत असलेल्या एका महिला डॉक्टरने एका तरुणावर गंभीर आरोप केले आहेत. यामध्ये त्या मुलाने महिलेचा शारीरिक छळ आणि जबरदस्तीने गर्भपात इतकेच नव्हे तर खाजगी फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे आरोप केले आहेत. महिलेने या प्रकरणाची तक्रार अंधेरीच्या एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली आहे.

डेटिंग अॅपवर झाली मैत्री 

न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेतील पीडिता म्हणजेच  वर्षीय डॉक्टरने ‘हिंगे’ नावाच्या डेटिंग अॅपवर आपली प्रोफाइल बनवली होती. याच अॅपच्या माध्यमातून तिची ओळख मुंबईतील डोंगरी येथे राहणाऱ्या 27 वर्षीय तरुणाशी झाली. त्याचं नाव खालिद खानयारी असल्याचं सांगितलं जात आहे. दोघांमध्ये हळूहळू संवाद वाढत गेला आणि त्या दोघांनी एकमेकांच्या संमतीने संबंध बनवले. यादरम्यान आरोपी तरुणाने त्या महिलेचे काही खाजगी फोटोजसुद्धा काढले.

हे ही वाचा: महिला फिजियोथेरापिस्टने पेशंटलाच पटवलं! नंतर पत्नीने काढला पतीचा काटा; हत्या केल्यानंतर घडलं असं काही..

डॉक्टरसोबत नेमकं काय घडलं

महिला डॉक्टरने केलेल्या आरोपांनुसार, त्या दोघांनी एकमेकांच्या संमतीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि यामुळे 2024 मध्ये ती गर्भवती राहिली. मात्र, त्या तरुणाने तिला बळजबरीने गर्भपात करण्यास भाग पाडले. या सगळ्या प्रकारानंतर तो महिलेकडे दुर्लक्ष करु लागला आणि तिच्याशी बोलणं टाळू लागला. मात्र, या काळात त्या आरोपी तरुणाचं कोणत्या दुसऱ्याच मुलीसोबत लग्न ठरलं असल्याचं पीडितेला कळालं.

हे ही वाचा: हॉटेलमध्ये मोठा कांड! खिडकीवर पडदा नव्हता, लोकांनी सगळंच पाहिलं..कपलचा प्रायव्हेट Video लीक

अखेर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल  

त्यानंतर महिलेला त्या आरोपीने लग्नाचं वचन देऊन धोका दिल्याची जाणीव झाली. या सगळ्या घटनेबद्दल पीडितेने आरोपीला जाब विचारला असता, त्याने तिला तिचे खाजगी फोटोज सर्वत्र व्हायरल करण्याची धमकी दिली. या सगळ्या प्रकारामुळे त्रस्त असलेल्या महिला डॉक्टरने सहन न झाल्यामुळे 20 जून रोजी अंधेरीच्या एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्या आरोपी तरुणाच्या विरोधात न्यायसंहितेच्या कलमांतर्गत बळजबरीने गर्भपात करणे, धमकी देणे आणि लग्नाचं वजन देऊन धोका देणे या गुन्ह्यांसाठी तक्रार दाखल केली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp