मुंबई ते चंद्रपूर… सेल्फीने ढकललं मृत्यूच्या जबड्यात! कुणी आई गमावली, तर कुणी तरूण मुलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbai bandra a mother drowned in sea chandrapur four boy drowned in river maharashta news
mumbai bandra a mother drowned in sea chandrapur four boy drowned in river maharashta news
social share
google news

सोशल मीडियावर (Social Media) लाईक्स आणि कमेंट मिळवण्यासाठी आजकालचे तरूण कोणत्याही थराला जातात. अगदी स्वत:च्या जीवाचीही पर्वा न करता जोखीम पत्करून व्हिडिओ अथवा फोटो काढत असतात. अशीच जोखीम आता जीवावर बेतल्याची महाराष्ट्रासह, देशाला हादरवणारी काही प्रकरणे समोर आली आहेत. विशेष म्हणजे साधारण गेल्या 72 तासातली ही प्रकरणे आहेत. मुंबईतल्या (Mumbai) प्रकरणात बीचवर सेल्फी (Selfi) घेताना एका आईने आपला जीव गमावला होता. धक्कादायक म्हणजे चिमुकल्यांनी आपल्या डोळ्यादेखत हा सर्व प्रकार पाहिला होता. यासह चंद्रपुरमध्ये देखील सेल्फीमुळे 4 तरूणांचा नदीत बुडून मृत्यू झाला होता. या दोन्ही घटनांमुळे सध्या महाराष्ट्र हळहळला आहे. (mumbai bandra a mother drowned in sea chandrapur four boy drowned in river maharashta news)

आईचा मृत्यू तर वडील बचावले

वांद्रेच्या बीचवर एक कुटुंब पावसाचा आनंद घेण्यासाठी गेले होते. यावेळी समुद्रात येणाऱ्या लाटांचा आनंद लुटण्यासाठी हे कपल बीचवरच्या दगडावर जाऊन बसले होते. फोटो काढण्यासाठी हे कपल दगडावर बसले होते. तर या जोडप्याची मुले किनाऱ्यावर उभी राहून सर्व प्रकार पाहत होती. या दरम्यान समुद्रातून जोरजोरात लाटा किनाऱ्याला धडकत होत्या. यावेळी मध्येच एक लाट आली आणि जोडप्याला समुद्रात खेचून घेऊन गेली. यामध्ये मुकेश सोनार (35) थोडक्यात बचावले, तर ज्योती सोनार (32) या लाटांसह समुद्रात वाहून गेल्या. मुकेश यांनी ज्योतीची साडी पकडून तिला वाचवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यांच्या हातून साडी निसटली आणि ज्योती समुद्रात वाहून गेल्या. विशेष म्हणजे समुद्रातून लाट येत असताना किनाऱ्यावर उभी असलेली मुले आईला माघारी येण्याची विनंती करत होती. मात्र आई-बाबा फोटो काढण्यात मुश्गुल होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी बचाव पथकाद्वारे ज्योतीचा शोध घेतला असता तिचा मृतदेह हाती लागला. या घटनेने सोनार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हे ही वाचा : Navi Mumbai Crime News : मासे कापण्याच्या सुऱ्याने मित्राचेच केले दोन तुकडे

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सेल्फीच्या नादात 4 मित्रांचा मृत्यू

चंद्रपुरमध्ये देखील रविवारी सेल्फीच्या नादात चार मित्रांनी जीव गमावल्याची धक्कादायक घटना घडली. चंद्रपुर जिल्ह्यातील नागभीड तालूक्यातील घोडाबाजारी तलावात शेगावचे 8 तरूण पावसाचा आनंद लुटण्यासाठी गेले होते. या तरूणांमधील एक तरूण तलावाच्या किनारी सेल्फी घेत होता. या दरम्यान त्याचा पाय घसरला आणि तो नदीपात्रात पडला होता. या तरूणाला वाचविण्यासाठी तीन तरूण एकामागोमाग एक नदीपात्रात उतरले. मात्र चौघा मित्रांचा तलावात बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले होते. या घटनेत मनीष श्रीरामे (26), धीरज झाडे (27), संकेत मोडक (25), चेतन मानदाडे (17) या मुलांचा नदीत बुडून मृत्यू झाला. रविवारी संध्याकाळी ही घटना घडली होती. या सध्या दोन्ही घटनांनी महाराष्ट्र हादरला आहे.

इंस्टाग्राम रील बनवताना दोघांचा मृत्यू

युपीच्या इटावातील दोन तरूण सिंगर नदीत उतरून इंस्टाग्राम रील बनवत होते. मात्र नदीच्या प्रवाहात बुडून या दोघांचा मृत्यू झाला होता. या घटनेतील मृत तरूणांचे नाव रेहान (17) आणि छोटे चांद (13) असे आहे. नदीच्या पाण्याची पातळी वाढली असताना हे दोघे तरूण उतरून अंघोळ करतानाचा इंस्टाग्राम रील बनवत होते. या दरम्यानच रेहानचा पाय घसरला आणि तो बूडु लागला, त्याला वाचवण्यासाठी चांदने प्रयत्न केले मात्र तो देखील या नदीपात्रात बुडाला आणि त्यांचा मृत्यू झाला. या तरूणासोबत 4 मुले देखील होती, मात्र ते या दोघांना वाचवू शकले नाही.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

इंस्टाग्राम रीलमुळे तरूणाच मृत्यू

कानपूरमधील पांडू नदीत पाच मुले इंस्टाग्रामवर रील बनवण्यासाठी आले होते. या मुलापैकी अंश नावाच्या तरूणाने इंस्टाग्रामवर रील बनवण्यासाठी नदीपात्रात उडी घेतली होती. अंशने नदीपात्रात उडी घेण्यापूर्वी आपल्य़ाला पोहायला येत असल्याची मित्रांना माहिती दिली होती. मात्र नदी पात्रात उडी घेताच तो गायब झाला होती. ही घटना पाहून त्याचे 4 मित्र ओरडण्याशिवाय काहीच करू शकले नाही. त्यामुळे इंस्टाग्राम रीलमुळे अंशचा मृत्यू झाला. दरम्यान या सर्व घटनेने देश हादरला आहे.

हे ही वाचा : Crime: दिराचं भयंकर कृत्य! वहिनीची हत्या केली अन् मृतदेह…; खुनाचं कारण आलं समोर

एकीकडे स्थानिक प्रशासनाकडून नागरीकांना समुद्रकिनारी आणि नदीत पात्रात जाण्यास मनाई करण्यात आले असताना देखील अनेक नागरीक हा आदेश डावलत आहे. ज्यामुळे सध्या महाराष्ट्रासह देशभरात अशा घटना घडत आहे. त्यामुळे आता नागरीकांनी प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करण्याची गरज आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT