Crime: दिराचं भयंकर कृत्य! वहिनीची हत्या केली अन् मृतदेह...; खुनाचं कारण आलं समोर - Mumbai Tak - nalanda sister in law beaten to death by brother in law for illegal relationship and money bihar crime story - MumbaiTAK
गुन्ह्यांची दुनिया बातम्या

Crime: दिराचं भयंकर कृत्य! वहिनीची हत्या केली अन् मृतदेह…; खुनाचं कारण आलं समोर

बिहारच्या नालंदात एका दीराने वहिनीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घटना घडली आहे. आशा देवी असे या महिलेचे नाव आहे. हत्येनंतर दीराने वहिनीचा मृतदेह फासावर लटकवला होता. जेणेकरून पोलिसांना ही घटना हत्या नव्हे तर आत्महत्या वाटावी, यासाठी त्याने हे कृत्य केले होते.
nalanda sister in law beaten to death by brother in law for illegal relationship and money bihar crime story

बिहारच्या (Bihar) नालंदात एका दिराने वहिनीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घटना घडली आहे. आशा देवी असे या महिलेचे नाव आहे. हत्येनंतर दिराने (brother in law) वहिनीचा (sister in law)  मृतदेह फासावर लटकवला होता. जेणेकरून पोलिसांना (police) ही घटना हत्या नव्हे तर आत्महत्या वाटावी, यासाठी त्याने हे कृत्य केले होते. दरम्यान पोलिसांनी आता घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. तसेच आता पोलिसांनी आरोपी दीरासह कुटुंबाचा शोध सुरु केला आहे. (nalanda sister in law beaten to death by brother in law for illegal relationship and money bihar crime story)

नूरसराय पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या आशा देवी हिचे लग्न 6 वर्षापुर्वी जहानाबाद क्षेत्रातील ओखरी गावात राहणाऱ्या अर्जुन रविदास यांच्याशी झाले होते. आशा आपल्या कुटुंबासह अजनौरा गावात भाड्याने राहायची. आशा आणि अर्जुनचा सुखी संसार सुरू होता. या दरम्यान दोन दिवसांपुर्वीच आशा गावी परतली होती. या दरम्यान आशाच्या दिराने तिला गावातील एका व्यक्तीसोबत बोलताना पाहिले होते.या गोष्टीचा दिराला फार राग आला होता. या रागातून दिराने वहिनीला जाब विचारला असता दोघांमध्ये वाद झाला. या वादातून दिराने वहिनीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत वहिनीचा मृ्त्यू झाला. या मारहाणीचा आरोप आपल्या माथी य़ेऊ नये यासाठी दिराने वहिनीचा मृतदेह फासावर लटकला होता. हा संपूर्ण प्रकार करून दिराने कुटुंबासह गावातून पळ काढला होता.

हे ही वाचा : Crime: शेजारणीवर बलात्कार, आरोपीच्या बायकोने तर पीडित महिलेसोबत केलं भयंकर कृत्य…

दरम्यान या हत्येनंतर स्थानिकांनी या घटनेची माहिती आशाच्या कुटुंबियांनी दिली होती. यानंतर आशाच्या कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या प्रकरणात महिलेच्या वडिलांनी दिरावर गंभीर आरोप केला आहे. अनैतिक संबंधाच्या संशयातून दिराने ही हत्या केली आहे.या हत्येनंतर दिराने महिलेचा मृतदेह फासावर लटकवला आहे, जेणेकरन हे प्रकरण आत्महत्येचा वाटावे, असा आरोप वडिलांनी केली आहे.

या प्रकरणावर नूरसराय पोलीस ठाण्याचे प्रमुख कुणाल चंद्र सिंह म्हणाले की, महिलेच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी घटनास्थळ गाठत महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. तसेच मृतदेह पोस्टमार्टमसाठी बिहार शरीफ सदर रुग्णालयात पाठवला आहे. पोस्टमार्टमनंतर मृत्यूचे खरे कारण समोर येणार आहे, असे कुणाल चंद्र सिंह म्हणाले आहेत. वडिलांनी महिलेच्या दिरावर हत्येचा आरोप केला आहे. सध्या महिलेच्या सासरचे सर्व कुटुंब गावातून फरार आहे.या कुटुबियांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

हे ही वाचा : Wife Swapping : ‘तू माझ्या मित्रासोबत झोप, मी त्याच्या पत्नीसोबत…’, उच्चभ्रू सोसायटीतील घटना

Magic Moments vs Smirnoff Vodka: लोकांच्या आवडत्या Vodka मध्ये ‘हा’ आहे फरक? भारतातील ती 10 शहरे… जिथे आहेत सर्वाधिक अब्जाधीश; मुंबईचा नंबर…? आईचा मृत्यू अन्… 144 किलोच्या महिलेने घटवलं 75 किलो वजन! रश्मिकानंतर आता दुसऱ्या हिरोईनसोबत रणबीरचे ‘ते’ सीन्स! मुलींमधील ‘हे’ विशेष गुण पाहून मुलं होतात आकर्षित… IPL च्या इतिहासात सर्वाधिक षटकार ठोकणारे ‘ते’ 5 खेळाडू कोण? Film पाहण्याची आवड आहे? मग ‘हे’ प्रेरणादायी चित्रपट एकदा बघाच! Belly Fat कमी करण्यासाठी अगदी सिंपल डाएट प्लान! हिवाळ्यात आळस न करता Weight Loss साठी घरीच करा ‘या’ सोप्या गोष्टी! UPSC : चार वेळा अपयश, पण मानली नाही हार; IRS अधिकारी प्रेरणादायी स्टोरी 144 किलोच्या महिलेने घटवलं 75 किलो वजन; खायची फक्त ‘या’ 8 गोष्टी… चाळीशीतही हॉट आणि फीट! अभिनेत्री nimrat kaur च्या फिटनेसचा विषयच नाही Vacation प्लान करताय? मग भारतातच अनुभवा हे विदेशी सौंदर्य! Weight Loss साठी ‘हा’ स्पेशल चहा एकदा पिऊनच पाहा! अंथरुणावर पडल्यावर लगेच झोप येते असेल तर वेळीच सावध व्हा… ही 5 फळे किडनीसाठी असतात फायदेशीर रक्तातील शुगर कधीच वाढणार नाही, फक्त एवढंच करा Vicky Kaushal वर सचिन तेंडुलकर इम्प्रेस; कारण… Alcohol चा रिकाम्या पोटी कसा होतो परिणाम? ‘या’ 5 गोष्टी खाऊन चुटकीसरशी घटवा Belly Fat!