महाजन... मलई आणि बरंच काही! 'त्या' घोटाळ्याची कागदपत्रं मुंबई Tak वर

ओमकार वाबळे

नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याआधी कोट्यवधींच्या टेंडरमध्ये गैरव्यवहार आणि कमिशनचे गंभीर आरोप समोर आले आहेत. तनय महाजन, नरेंद्र महाजन आणि शकील शेख यांच्यावरील आरोपांसह टेंडर, वर्क ऑर्डर आणि कथित पैशांच्या व्यवहाराचा जाणून घ्या संपूर्ण तपशील.

ADVERTISEMENT

nashik kumbh mela 2027 tender scam minister girish mahajan allegations
nashik kumbh mela 2027 tender scam
Google CTA

नाशिक: तुम्ही धार्मिक असाल, वेगवेगळ्या धर्मस्थळांना भेटी देत असाल आणि तुमच्या श्रद्धा-भावना धर्माशी जोडलेल्या असतील, तर नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर समोर आलेल्या आरोपांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. कारण कुंभमेळा सुरू होण्याआधीच या भावनांच्या नावावर पैशांचा खेळ सुरू झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी कोट्यवधी रुपयांची विविध कामांची टेंडर प्रक्रिया सुरू आहे. याच प्रक्रियेत सुमारे 600 ते 700 कोटी रुपयांच्या टेंडरमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही टेंडर अस्तित्वातच नसताना त्यांच्यासाठी पैसे घेण्यात आल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. या प्रकरणातील काही व्यक्तींनी पैसे घेतल्यानंतर फरार झाल्याचाही आरोप आहे.

या प्रकरणातील तक्रारींमध्ये काही नावं वारंवार समोर येत आहेत. त्यात तनय महाजन, नरेंद्र महाजन आणि शकील अहमद सलीमुद्दीन शेख यांचा समावेश असल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे.

केटरिंग टेंडरमध्ये 20 टक्के कमिशनचा आरोप

छत्रपती संभाजीनगर येथील एका केटरिंग व्यावसायिकाने केलेल्या तक्रारीनुसार, जानेवारी-फेब्रुवारी 2026 मध्ये त्याला नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यातील हाऊसकीपिंग आणि जेवणाच्या टेंडरबाबत माहिती देण्यात आली. त्याची ओळख शकील शेख याच्यामार्फत तनय महाजन आणि नरेंद्र महाजन यांच्याशी करून देण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.