“माणसातला विषारी साप हसत हसत डसतो!” भल्या मोठ्या सापासोबत Video अन् रोहिणी खडसेंची 'ती' पोस्ट

मुंबई तक

Rohini Khadse Video: रोहिणी खडसेंची ‘माणसातला विषारी साप हसत हसत डसतो’ अशी सूचक पोस्ट चर्चेत आली आहे. नाव न घेता केलेल्या या पोस्टमधून नेमका कुणाला इशारा दिला, याची राजकीय चर्चा सुरू आहे.

ADVERTISEMENT

ncp sp leader and eknath khadse daughter rohini khadse snake video political post maharashtra politics
रोहिणी खडसेंचा सापासोबतचा व्हिडिओ
Google CTA

जळगाव: “प्राण्यांमधला साप विषारी असतो, पण त्याचा दंश निदान ओळखता तरी येतो… माणसातला विषारी साप मात्र, हसत हसत डसतो! बरोबर ना मंडळी…” अशी पोस्ट राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. यावेळी त्यांनी धामण हा भला मोठा बिनविषारी साप हाती घेत व्हिडिओ देखील शेअर केला आहे.

या पोस्टमध्ये रोहिणी खडसे यांनी कोणाचेही नाव घेतलेले नाही. मात्र, ‘माणसातला विषारी साप’, ‘हसत हसत डसतो’ या शब्दप्रयोगामुळे त्यांच्या पोस्टचा राजकीय अर्थ लावला जात आहे. नेमका हा टोला कुणाला उद्देशून आहे, याबाबत त्यांनी कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.

पोस्टमधून नेमका कोणाला इशारा?

रोहिणी खडसे यांच्या राजकीय पोस्टमध्ये अनेकदा सरकार आणि सत्ताधारी राजकारण्यांवर टीका पाहायला मिळते. त्या सध्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या महिला आघाडीच्या नेतृत्वात आहेत. त्यामुळे त्यांच्या नव्या पोस्टकडेही महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पाहिले जात आहे.

हे ही वाचा>> 'निवडणूक आयोगाने "तो" निर्णय आधीच ठरवलेला', ठाकरेंच्या वकिलाचा कोर्टात मोठा आरोप

मात्र, या विशिष्ट पोस्टमध्ये कोणाचेही नाव नसल्याने ती कोणत्या नेत्याला, पक्षाला किंवा राजकीय घटनेला उद्देशून आहे, हे निश्चितपणे सांगता येत नाही.