खूप दिवसांनी भेटायला गेला, बायकोने डोक्यात थेट तवाच घातला; नवऱ्याला का संपवलं?
क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून लखनऊमध्ये पत्नीने रागाच्या भरात पतीच्या डोक्यावर लोखंडी तव्याने जोरदार वार केला. यामध्ये पतीचा मृत्यू झाला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
खूप दिवसांनी भेटायला गेला
बायकोने डोक्यात थेट तवाच घातला
नवऱ्याला का संपवलं?
Crime News : पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी एक अत्यंत खळबळजनक घटना समोर आली आहे. क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून पत्नीने रागाच्या भरात पतीच्या डोक्यावर लोखंडी तव्याने जोरदार वार केला. या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पतीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवून आरोपी पत्नीला ताब्यात घेतले आहे. उत्तर प्रदेशातील लखनऊ शहरातील ही घटना आहे.
5 वर्षांपासून कौटुंबिक कलह
आशिष सोनी उर्फ शनी असे या मृत ऑटो चालकाचे नाव असून तो पीजीआय भागातील कल्ली पश्चिमचा रहिवासी होता. मिळालेल्या माहितीनुसार, आशिष आणि त्याच्या पत्नीमध्ये गेल्या 5 वर्षांपासून कौटुंबिक कलह सुरू होता. सततच्या भांडणामुळे दोघेही गेल्या काही काळापासून एकमेकांपासून वेगळे राहत होते. पत्नी जानकीपुरम येथील आनंद विहार कॉलनीत राहत होती. गुरुवारी (13 ऑगस्ट) आशिष आपली रिक्षा घेऊन पत्नीच्या घरी गेला असता, तेथे त्यांच्यात पुन्हा एकदा जोरदार वाद झाला. हा वाद विकोपाला जाऊन या दुर्दैवी घटनेत रूपांतरित झाला.
हे ही वाचा : रुग्णालयाच्या शौचालयात नर्सचा मृतदेह, नाईट ड्यूटीवर असताना काय घडलं?
डोक्यात घातला तवा
वादादरम्यान संतप्त झालेल्या पत्नीने घरातील लोखंडी तवा उचलून आशिषच्या डोक्यावर एकापाठोपाठ एक अनेक वार केले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे आशिष रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने त्याला तात्काळ ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे मृत आशिषच्या कुटुंबावर शोकाकुल वातावरण पसरले असून संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
हे ही वाचा : फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये रक्तरंजित कांड, बापाने पोटच्या मुलींना संपवले; नेमकं कारण काय?
आईचा आरोप काय?
या प्रकरणी मृत आशिषच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली असून सूनेवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. आई मिथिलेश यांच्या सांगण्यानुसार, गुरुवारी दुपारी पोलिसांकडून त्यांना मुलाच्या मृत्यूची माहिती मिळाली. रुग्णालयात पोहोचल्यानंतर आशिषच्या डोक्यावर गंभीर जखमांच्या खुणा होत्या. तक्रारीत नमूद केल्यानुसार, सूनेच्या घराबाहेर आशिषची ऑटो रिक्षा उभी आढळली. तसेच सूनेव्यतिरिक्त तिचे नातेवाईक प्रियंका, गोलू, शिवम आणि तिच्या मेहुण्याने यापूर्वीही आशिषला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली होती, असा आरोपही आईने केला आहे. पोलीस सध्या या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
