विवाहित प्रियकरावर लग्नासाठी दबाव टाकणे जीवावर बेतले, बेबीची क्रूरपणे हत्या
Crime News : लग्नाच्या दबावावरून विवाहित महिलेची तिच्याच प्रियकराने हत्या केल्याचा आरोप आहे. मृत महिलेच्या नातेवाईकांनी आरोपीच्या एन्काउंटर आणि फाशीची मागणी करत रास्ता रोको केला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
विवाहित प्रियकरावर लग्नासाठी दबाव टाकणे जीवावर बेतले
, बेबीची क्रूरपणे हत्या
Crime News : बुलंदशहरच्या खुर्जा येथील शिवलोक कॉलनीत प्रेमसंबंधातून एका महिलेची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, बेबी नावाची विवाहित महिला तिच्याच विवाहित प्रियकर अजितसोबत लग्न करू इच्छित होती. ती अजीतवर लग्नासाठी सातत्याने दबाव टाकत होती. मंगळवारी रात्री दोघांची भेट झाली. यावेळी लग्नाच्या मुद्द्यावरून त्यांच्यात वाद झाला. आरोप आहे की, याच वादातून अजितने बेबीवर चाकूने अनेक वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बेबीचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी अजितला अटक केली आहे.
हेही वाचा : मान्सून अपडेट: पाऊस आता देणार हुलकावणी? पाहा नेमका कशाचा होतोय परिणाम
बेबी स्वतःही मजुरीचे काम करत होती
मृत बेबी ही दिल्लीची रहिवासी होती. तिचे लग्न पंकज याच्यासोबत झाले होते. पंकज नेहरूपूर गावात हलवाईचे काम करतो. बेबी आणि पंकज यांना चार मुले आहेत. बेबी स्वतःही मजुरीचे काम करत होती. बेबीच्या घरापासून सुमारे 200 मीटर अंतरावर अजित राहत होता. अजितही विवाहित आहे. मात्र, सुमारे तीन वर्षांपूर्वी झालेल्या वादानंतर त्याची पत्नी त्याला सोडून गेली होती. अजितला दोन मुली असून त्या त्यांच्या काकांसोबत राहतात. पत्नी गेल्यानंतर अजित एकटाच राहत होता. याच काळात बेबी आणि अजित यांच्यात जवळीक वाढली आणि दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. बेबीचे अजितच्या खोलीवर येणे-जाणेही होते.
हेही वाचा : Personal Finance: मुंबईत स्वत:च घर घेऊन EMI भरावा की Rent वर राहून SIP करावी?
