Personal Finance: मुंबईत स्वत:च घर घेऊन EMI भरावा की Rent वर राहून SIP करावी?
Home Rent and SIP: मुंबईत घर खरेदी करणं फायदेशीर की Rent वर राहून दरमहा SIP करणं? घर खरेदी आणि Rent आणि SIP या दोन्ही पर्यायांचे फायदे-तोटे जाणून घेऊन तुमच्यासाठी योग्य आर्थिक निर्णय कसा घ्यायचा ते पाहा.
ADVERTISEMENT

Personal Finance tips for Home Rent and SIP: मुंबईत स्वतःचं घर असावं, हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण आजच्या महागाईच्या काळात Home Loan घेऊन घर खरेदी करणं चांगलं की Rent वर राहून दरमहा मोठी रक्कम SIPमध्ये गुंतवणं अधिक फायदेशीर? हा प्रश्न अनेक तरुण नोकरदार आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसमोर आहे. या निर्णयाचं उत्तर फक्त घराच्या किंमती वाढतात किंवा SIP मध्ये परतावा मिळतो इतकं सोपं नाही. EMI, भाडं, डाउन पेमेंट, Home Loan Interest, Maintenance, Property Appreciation आणि SIP Returns या सगळ्यांचा एकत्रित हिशोब करावा लागतो.
घर खरेदी म्हणजे फक्त EMI नाही
मुंबईत एखादं घर 1 कोटींचं आहे. त्यासाठी 20% म्हणजे 20 लाख Down Payment दिलं आणि उर्वरित 80 लाख Home Loan घेतलं, तर EMI ही व्याजदर आणि कर्जाच्या कालावधीनुसार ठरेल.
मात्र, घर खरेदी करताना फक्त EMI पाहून निर्णय घेऊ नका. त्यासोबत Stamp Duty, Registration, GST लागू असल्यास त्याचा खर्च, Brokerage, Interior, Society Maintenance, Property Tax आणि भविष्यातील Repair खर्च यांचाही विचार करावा लागतो.
म्हणजेच 1 कोटींचं घर प्रत्यक्षात तुमच्या बजेटवर त्यापेक्षा मोठा आर्थिक भार टाकू शकतं.
