मान्सून अपडेट: पाऊस आता देणार हुलकावणी? पाहा नेमका कशाचा होतोय परिणाम

मुंबई तक

महाराष्ट्रात 1 ते 10 ऑगस्टदरम्यान सरासरीपेक्षा 36% कमी पाऊस झाला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील आठवड्यात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.

ADVERTISEMENT

maharashtra rain forecast august 2026 rain deficit bengal bay low pressure
प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: चॅटजीपीटी
Google CTA

मुंबई: जून आणि जुलैच्या पहिल्या 15 दिवसांत महाराष्ट्रात पावसाची मोठी तूट निर्माण झाली होती. मात्र, जुलैच्या शेवटच्या पंधरवड्यात झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे ही तूट मोठ्या प्रमाणात भरून निघाली. आता ऑगस्ट महिन्यात पुन्हा पावसाची परिस्थिती काहीशी अनिश्चित दिसत आहे. 1 ते 10 ऑगस्टदरम्यान राज्यात सरासरीपेक्षा 36 टक्के कमी पाऊस झाला आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र

सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे. या प्रणालीची तीव्रता वाढल्यास त्याचं रूपांतर डिप्रेशनमध्ये होऊ शकतं. त्यामुळे बंगाल, ओडिशा आणि झारखंडसह मध्य आणि पूर्व भारतातील काही भागांत पावसासाठी पोषक वातावरण तयार झालं आहे. याचा परिणाम महाराष्ट्रावरही होण्याची शक्यता आहे.

13 ते 20 ऑगस्टदरम्यान महाराष्ट्रात कुठे पाऊस?

हवामान खात्याच्या अंदाजानुसार 13 ते 20 ऑगस्टदरम्यान मुंबईसह कोकण पट्ट्यात पावसाची शक्यता आहे. विदर्भातील काही भागांतही चांगला पाऊस होण्याचे संकेत आहेत. मात्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात या काळात तुलनेने कमी पाऊस होण्याची शक्यता आहे.

14 ऑगस्टला कोकण-मध्य महाराष्ट्रासाठी यलो अलर्ट

14 ऑगस्टच्या वेदर वॉर्निंगमध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागांत पावसाची शक्यता आहे.