चार महिन्यांवर लग्न आलं, पण असं काही घडलं की दोघांचा मृतदेह आढळला

मुंबई तक

kasaragod couple death case : 26 डिसेंबरला विवाह होणार होता पण तरुणीचा म्हैसूरमध्ये, तर तरुणाचा एर्नाकुलममध्ये मृत्यू झाला. मृत्यूच्या आधी दोघांमध्ये व्हिडिओ कॉल झाल्याचे वृत्त आहे; मात्र दोन्ही मृत्यूंचा परस्पर संबंध असल्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही.

ADVERTISEMENT

kasaragod couple death case
kasaragod couple death case
Google CTA

बातम्या हायलाइट

point

चार महिन्यांवर लग्न आलं

point

पण असं काही घडलं की दोघांचा मृतदेह आढळला

Crime News : कासारगोडमधून धक्कादायक घटना समोर आलीये.  26 डिसेंबर रोजी विवाह होणार असलेल्या तरुण आणि तरुणीचाही मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आलाय. दोघांचे मृतदेह बुधवारी सकाळी वेगवेगळ्या ठिकाणी आढळून आले. पल्लिक्कारा येथील पी. अनुस्री (वय 25) ही म्हैसूरमधील हुन्सूर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत काम करत होती. ती हुन्सूरमधील भाड्याच्या घरात मृतावस्थेत आढळून आली. तिच्या मृत्यूची माहिती समोर आल्यानंतर तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा मृतदेहही एर्नाकुलममध्ये आढळून आला.

हेही वाचा : फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये रक्तरंजित कांड, बापाने पोटच्या मुलींना संपवले; नेमकं कारण काय?

दोघांचेही मृतदेह आढळल्याने उडाली खळबळ 

अनुस्रीचा होणारा नवरा अमल (वय 26) हा एर्नाकुलममधील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत कार्यरत होता. त्याचा मृतदेह नंतर नॉर्थ रेल्वे स्टेशनजवळील एका हॉटेलच्या खोलीत छताच्या पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. दोघांचा विवाह 26 डिसेंबर रोजी होणार होता. त्यामुळे एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी दोघांचे मृतदेह आढळल्याने या घटनेबाबत चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा : राहुल गांधींनी बोलावलं.. थेट मिठी मारली आणि नंतर.. सगळे हसत राहिले..