नागपूर: 19 वर्षीय BDS विद्यार्थ्यावर रॅगिंग, अश्लील कृत्य केल्याचा आरोप
Nagpur Crime News : डॉक्टर बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून उत्तर प्रदेशातील हमीरपूर येथून नागपुरात आलेल्या 19 वर्षीय विद्यार्थ्यासोबत कथित रॅगिंग करत अश्लील कृत्य केल्याचा प्रकार समोर आला आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या दंत विभागाच्या वसतिगृहात पहिल्याच दिवशी वरिष्ठ विद्यार्थ्यांकडून छळ झाल्याचे सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
विद्यार्थ्यासोबत कथित रॅगिंगचा धक्कादायक प्रकार
अश्लील कृत्ये करण्यात आल्याचा आरोप
Nagpur Crime : डॉक्टर बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून उत्तर प्रदेशातील हमीरपूर येथून नागपुरात आलेल्या 19 वर्षीय विद्यार्थ्यासोबत कथित रॅगिंगचा धक्कादायक प्रकार घडल्याचा आरोप समोर आला आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या दंत विभागाच्या वसतिगृहात पहिल्याच दिवशी वरिष्ठ विद्यार्थ्यांकडून छळ झाल्याचे सांगण्यात येत असून, या घटनेनंतर विद्यार्थी प्रचंड दडपणाखाली आला असून त्याला त्याच महाविद्यालयात शिकण्याची भीती वाटत आहे. या प्रकरणात रॅगिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांपाठोपाठ महाविद्यालय प्रशासन आणि अधिष्ठाता (डीन) यांच्या कथित भूमिकेवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
हे ही वाचा : Astrology : 'या' राशींना आर्थिक लाभ, जाणून घ्या 12 राशींचे भविष्य
नेमका प्रकार काय?
पीडित विद्यार्थी मोहम्मद हसनैन हा मूळचा उत्तर प्रदेशातील हमीरपूर येथील रहिवासी आहे. कुटुंबाची आर्थिक स्थिती सर्वसामान्य असून तो अभ्यासात हुशार असल्याचे सांगितले जाते. नीट परीक्षेच्या आधारे त्याला दंत वैद्यकीय शाखेच्या प्रथम वर्षात प्रवेश मिळाला. त्यानंतर कुटुंबीयांनी त्याला डॉक्टर बनवण्याचे स्वप्न पाहत नागपूरला पाठवले.
अश्लील कृत्ये करण्यात आल्याचा आरोप
पीडिताच्या मावशी रुहीना सिद्दीकी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हसनैनचा 26 ऑक्टोबर रोजी प्रवेश झाला आणि तो नागपुरात आला. पहिल्याच दिवशी सुमारे 13 ते 14 वरिष्ठ विद्यार्थ्यांनी त्याचे कथित रॅगिंग केले. वसतिगृहात त्याच्याशी गैरवर्तन करण्यात आले, कपडे काढण्यास भाग पाडले गेले, 'कोंबडा' बनवण्यात आले आणि अश्लील कृत्ये करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकारानंतर हसनैन हादरून गेला असून त्याला अस्वस्थता आणि तणावाचा त्रास जाणवू लागला आहे. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, तो कोणत्याही व्यसनाच्या आहारी गेलेला नव्हता आणि केवळ अभ्यासासाठी आला होता; मात्र या घटनेनंतर त्याने महाविद्यालयात जाण्याची इच्छाच गमावली आहे.
10 लाख रुपयांच्या बॉण्डचा आरोप आणि प्रशासनावर नाराजी
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मावशी रुहीना सिद्दीकी नागपुरात पोहोचल्या. त्यांनी महाविद्यालय प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. प्रवेशाच्या वेळी कुटुंबीयांकडून 10 लाख रुपयांचा बॉण्ड सही करून घेण्यात आला असून, प्रवेश रद्द करायचा झाल्यास 10 लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.
तसेच, रॅगिंगचा मुद्दा प्रशासनासमोर मांडला असता, अधिष्ठातांनी या प्रकाराला 'सामान्य रॅगिंग' ठरवत अशा घटना घडत असतात, असे वक्तव्य केल्याचा आरोप रुहीना सिद्दीकी यांनी केला आहे. पीडिताला भेटण्यासाठी आणि वसतिगृहाची पाहणी करण्यासाठी कुटुंबीय गेले असता त्यांना आत जाण्यास परवानगी देण्यात आली नाही. डीन आणि संबंधित अधिकाऱ्यांशी समोरासमोर चर्चा होऊ शकली नसल्याचे आणि केवळ परत पाठवण्याची भाषा केली जात असली तरी प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
हे ही वाचा : 6 महिन्यांच्या गर्भवती महिलेची गळा दाबून हत्या, प्रियकराच्या आवळल्या मुसक्या
पोलिसांत तक्रार आणि उपस्थित होणारे प्रश्न
या प्रकरणी अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीत आयुष सी. आर., नरेंद्र सिंग, अमान खान आणि अन्य एका विद्यार्थ्याचे नाव समोर आले असून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
