बड्या संस्थाचालकाच्या मुलाचं रॅगींग, प्रकरण मंत्रालयापर्यंत गेलं, सिनीयर विद्यार्थ्यांनी असं काय करायला लावलं?
ससून रुग्णालयाचे डीन डॉ. एकनाथ पवार यांना ही बाब सांगण्यात आली. मात्र, त्यांनीही कोणतीही दखल घेतली नाही. यामुळे संबंधित प्रकरणात मुंबई वैद्यकीय शिक्षण विभागाकडे दाद मागण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

बड्या संस्था चालकाच्या मुलासोबत रॅगींगचा प्रकार

पुण्यातील बी.जे. मेडीकल कॉलेजमधील घटना

मंत्रालयापर्यंत गेली तक्रार, त्या विद्यार्थ्यांवर काय कारवाई?
Pune Crime News : शिक्षणाचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नामांकीत शिक्षण संस्थेचे संस्थातक असलेल्या व्यक्तीच्या नातवालाच रॅगींगचा सामना करावा लागलाय. बी.जे. मेडीकल वैद्यकीय महाविद्यालयात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पीडित विद्यार्थी हा आर्थोपेडीक अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाचा विद्यार्थी होता. त्याच विभागातील दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी ही केल्याचा आरोप आहे. दरम्यान, संबंधित प्रकरणाची तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप पीडित विद्यार्थ्याने केला आहे.
काय आहे प्रकरण?
संबंधित प्रकरणात, पहिल्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची त्याच्याच विभागातील दोन विद्यार्थ्यांनी रॅगींग केली. त्याला डोक्यावरून कधी थंडगार पाणी, तर कधी गरम पाणी अंगावर ओतून घेण्यास भाग पाडलेजात होते. या प्रकरणात विद्यार्थ्याने ही गोष्ट आधी आर्थोपीडिक विभागाचे विभागप्रमुख डॉ. गिरीश बारटक्के यांना सांगितली. मात्र, त्यांनी याची कोणतीही दखल घेतली नसल्याचा आरोप पीडिताने केला आहे.
हे ही वाचा >> CM फडणवीसांची मुलगी दिविजाचा दहावीचा निकाल जाहीर, पाहा किती टक्के मिळाले?
यानंतर ससून रुग्णालयाचे डीन डॉ. एकनाथ पवार यांना ही बाब सांगण्यात आली. मात्र, त्यांनीही कोणतीही दखल घेतली नाही. यामुळे संबंधित प्रकरणात मुंबई वैद्यकीय शिक्षण विभागाकडे दाद मागण्यात आली आहे. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. या समितीच्या अहवालानंतर दोन विद्यार्थ्यांना सहा महिन्यांसाठी म्हणजे अभ्यासक्रमाच्या एका टर्मसाठी निलंबीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
डॉ. एकनाथ पवार मूग गिळून गप्प
डॉ. एकनाथ पवार या प्रकरणात मूग गिळून गप्प आहेत. संबंधित प्रकरणात त्यांची कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. ही माहिती समोर येऊ नये यासाठी महाविद्यालयाकडून खबरदारी घेतली जात असल्याची चर्चा आहे. मंत्रालयाच्या स्तरावर विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी तक्रार केली असल्याने, या प्रकरणाची माहिती समोर आली.
दरम्यान, अनेक दिवस या विद्यार्थ्याला त्रास होत असल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित तक्रारदार विद्यार्थ्याच्या कुटुंबाने याची थेट तक्रार ही मंत्रालय स्तरावर केली. यानंतर संबंधित महाविद्यालय प्रशासन जागं झालं आणि त्यांनी अँटीरॅगींग समिती तयार करून बैठक बोलावली.
हे ही वाचा >> शाहीद आफ्रिदीने पाकिस्तानी सैन्याच मोठं 'गुपित' केलं उघड, भारताचा हल्ला करण्याचा मार्ग झाला सोप्पा!
ज्यामध्ये तक्रारदार विद्यार्थ्यांकडून आणि ज्याच्या विरोधात तक्रार करण्यात आली अशा विद्यार्थ्यांकडून माहिती घेण्यात आली. या प्रकरणाचा अहवाल तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. या प्रकरणात गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.