प्रेमविवाहाचा राग, निवृत्त PSI बापाने हळदीच्या कार्यक्रमात लेकीला गोळी घालून संपवलं, तर जावईही...

मुंबई तक

प्रेमविवाहाला विरोध असलेल्या किरण मांगले याच्या डोक्यात राग होता. त्यामुळे संतप्त होऊन तो थेट हळदीच्या कार्याक्रमात पोहोचला आणि तृप्तीवर गोळ्या झाडल्या.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

प्रेमविवाह केल्याचा राग, बापानं लेकीला गोळ्या घातल्या

point

हळदीच्या कार्याक्रमात घुसून लेकीला संपवलं

point

जावयावरही गोळ्या घातल्या, एक महिलाही जखमी

Jalgaon Chopda Honor Killing : जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात ऑनर किलिंगची धक्कादायक घटना घडली आहे. प्रेमविवाहाच्या रागातून सीआरपीएफच्या निवृत्त पीएसआय किरण मांगले यांने आपल्या मुलीवर लग्नाच्या कार्यक्रमात बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात त्यांची मुलगी तृप्ती मांगले हिचा जागीच मृत्यू झाला, तर जावई अविनाश वाघ आणि आणखी एक महिला गंभीर जखमी झाली आहे. यावेळी संतप्त जमावाने किरण मांगले यांना पकडून त्यांना बेदम चोप दिला.

नेमकं काय घडलं?

वर्षभरापूर्वी तृप्ती मांगले हिने अविनाश वाघ याच्याशी प्रेमविवाह केला होता. हे दाम्पत्य पुण्यात राहत होतं. चोपड्यात अविनाशच्या नातेवाईकांच्या लग्नासाठी ते दोघं आले होते. किरण मांगले यांच्या डोक्यात राग तसाच होता. त्यांना दोघे चोपड्यामध्ये आल्याची माहिती मिळाली. संतप्त होऊन किरण मांगले थेट लग्नस्थळी पोहोचला आणि तृप्तीवर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात तृप्तीचा मृत्यू झाला, तर अविनाश आणि एका महिलेला गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर जमावाने किरण मांगले यांना मारहाण केल्यानं त्याचीही प्रकृती गंभीर झाली आहे.

हे ही वाचा >> मुंबईतील ईडी कार्यालयाला मोठी आग, 'त्या' फाईल जळाल्या की वाचल्या?

जखमी अविनाश वाघ आणि किरण मांगले यांना जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे चोपडा शहरात भीतीचं वातावरण पसरले असून, संपूर्ण जळगाव जिल्हा हादरला आहे.

हे ही वाचा >> "चलो काश्मीर..." अभिनेता अतुल कुलकर्णीचा काश्मीर दौरा, अर्थ काय?

पोलिसांच्या प्राथमिक तपासात ही घटना प्रेमविवाहाला विरोध आणि कौटुंबिक वैमनस्यातून घडल्याचे समोर आले आहे. किरण मांगले यांच्याविरुद्ध कठोर कारवाईचे करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. ही घटना ऑनर किलिंगच्या वाढत्या प्रकारांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी घटना म्हणून पाहिली जातेय.

हे वाचलं का?

    follow whatsapp