3 महिने सतत... महिला झाली प्रेग्नंट, तिच्या मुलीसोबतही रिजवानचा घाणेरडा खेळ, नेमकं काय केलं?
बिजनौरमधून एक खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. येथे रिझवान नावाच्या तरुणाने एका विधवा महिलेसोबत आणि तिच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलं आहे.
ADVERTISEMENT

बिजनौर: उत्तर प्रदेशातील बिजनौरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे रिजवान नावाच्या तरुणावर गंभीर आरोप करण्यात आला आहे. रिजवानने एका हिंदू विधवा महिलेसोबत आणि तिच्या अल्पवयीन मुलीसोबत घाणेरडे कृत्य केल्याचा आरोप आहे. रिजवानवर आरोप आहे की, आधी त्याने विधवा महिलेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि नंतर तिच्यावर बलात्कार केला.
पीडितेचे म्हणणे आहे की, रिजवानने तिला लग्नाचे आश्वासन दिलेले आणि इस्लाम स्वीकारण्यासाठी तिच्यावर दबाव आणला. या काळात त्याने तिच्यासोबत 3 महिने शारीरिक संबंधही ठेवले, ज्यामुळे ती गर्भवतीही राहिली. आरोपी एवढ्यावरच नाही थांबला तर त्याने तिच्या 17 वर्षांच्या मुलीला देखील आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. तिच्याशीही त्याने शारीरिक संबंध ठेवले.
हे ही वाचा>> बेडरूममधून आवाज आल्यानंतर दिराला आली जाग! दरवाजा उघडण्याआधीच सुनेनं बॉयफ्रेंडला लपवलं, पण नंतर घडलं...
पीडित महिलेचे म्हणणे आहे की, रिजवानचा भाऊ इम्राननेही तिच्या मुलीसोबत घाणेरडे कृत्य केले आहे. या प्रकरणाचा तपास केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि एका आरोपीला अटकही केली आहे.
रिजवानने विधवा महिलेसोबत नको ते केलं...
बिजनौर कोतवाली शहरातून हे खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. मोहल्ला जुलाहान येथील रहिवासी रिजवानवर खळबळजनक आरोप आहेत. कोतवाली शहरात राहणारी महिला एका ब्युटी पार्लरमध्ये काम करते. तिच्या पतीचे 5 वर्षांपूर्वी निधन झाले. तिच्या पतीच्या निधनानंतर ती तिच्या मुलीसह घरात एकटीच राहते.